दूध व दूध पावडरच्या अनुदानासाठी एक ऑगस्टपासून एल्गार
पालम ,प्रतिनिधी – गाईच्या दुधाला सरसकट दहा रुपये प्रति लिटर दूध पावडर साठी प्रति किलो 50 रुपये अनुदान देण्यात यावे या मागणीसाठी एक ऑगस्टपासून महायु तीच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्याचा इशारा व रासप व मित्र पक्षाच्या वतीने आज तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे.
बॅंकेकडून कर्जपुरवठा करण्यास चालढकल केली जात आहे तर शेतकऱ्यांना बोगस बियाणे पुरून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे अशा भयावह परिस्थिती राज्य सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यास धजावत नाही त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे महाराष्ट्रात एक कोटी 40 लाख लिटर गाईचे दूध उत्पादित होते त्यापैकी 35 लाख लिटर दूध शेतकरी संघाकडून खरेदी केली जात आहे तर पंधरा लाख लिटर दूध शेतकरी स्वतः हॉटेल व ग्राहक यांना पुरवठा करतो शासकीय दारे फक्त एक लाख लिटर दूध खरेदी केले.
जातेकोरोना संसर्गामुळे लाँकडाऊन झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर दूध विक्री होत नाही त्यामुळे लाखो रुपयाचे दररोज दूध शेतकऱ्यांचे घरीच राहत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे एकीकडे जनावरास महागडा खाद्य पुरवठा करावा लागतो आहे तर दुसरीकडे दुधच विक्री होत नाही जे काही दूध विक्री होत आहे तेही कवडीमोल भावाने विकावे लागत आहे .
त्यामुळे प्रति लिटर दुधास दहा रुपये प्रति किलो दूध पावडर 50 रुपये अनुदान देण्यात यावे अन्यथा एक ऑगस्ट रोजी रासप वमहायुतीच्या वतीने आंदोलन करूनसरकारचे लक्ष वेधन्यासाठी मंत्रिमंडळातील सर्व सहकाऱ्यांना दूध पाठवून आंदोलनाची सुरुवात करण्याचा इशारा रासप महायुतीच्या वतीने देण्यात आला आहे सोमवारी रासप मित्रमंडळाच्या महायुतीच्या वतीने तहसीलदार पालम यांना निवेदन देण्यात आले या निवेदनावर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कुरे, भगवान शिरस्कर, अतुल धुळगुंडे, नवनाथ पोळ ,तायारखाँ पठाण, शेख इस्माईल पीरखा पठाण आधी कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पाण्याविना हाल , रस्त्यावर कचरा ,नाल्याही तुंबल्या