देवगांवफाटा येथील 1254 लाभार्थ्यांना मिळणार मोफत धान्याचा लाभ
उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांचे हस्ते गुरूवारी झाला शुभारंभ
सेलू, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात केंद्र व राज्य शासनाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत देवगांवफाटा स्वस्त धान्य दूकानातील 1254 लाभार्थ्यांना मे महिन्यात या डबल मोफत धान्य चा लाभ मिळणार आहे.या मोफत धान्य वाटपाचा शुभारंभ गुरुवारी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांचे हस्ते सोशल डिस्टन्स चे पालन करीत करण्यात आला.
सेलू तालुक्यातील देवगांवफाटा येथील धान्य दुकानानात अंत्योदय योजनेतील लाभार्थी सौ तूळसाबाई सदाशिव वरणे यांना उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी यांचे हस्ते 20 मे रोजी मोफत गव्हू व तांदुळ हे धान्य वितरीत करण्यात आले.या प्रसंगी नायब तहसीलदार अनंत शहाणे,धान्य दूकानदार बाबुआप्पा साळेगांवकर ,मोकींदराव मोरे,रामराव सातपुते, भगवान सातपुते, गुलाबराव मोरे,दत्तराव सोन्ने, विठ्ठल सातपुते, पंडित मोरे,भगवान पांचाळ यांची उपस्थिती होती.
कोरोना विषाणू वर आटकावासाठी सुरू असलेल्या लाँकडाऊन ने अनेकांचा लहान – मोठा व्यवसाय बंद झालेला आहे.तर मजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांची उपासमार होऊ नये यासाठी मे महिन्याकरीता राज्य शासनाने अंत्योदय साठी प्रतिकार्ड 23 किलो गव्हू व 12 किलो तांदूळ तर प्राधान्य मध्ये माणसी 3 किलो गव्हू व 2किलो तांदूळ मोफत दिले आसुन मे महिन्यातच केंद्र शासनाने पंतप्रधान गरिब कल्याण योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य या दोन्ही साठी माणसी 3 किलो गव्हु व 2 किलो तांदूळ मोफत दिले जाणार आहे.या डबल मोफत धान्य योजनेचा लाभ येथील 1254 मिळणार आहे.
मोफत योजनेअंतर्गत धान्य मिळात असल्याने लाभार्थ्यांना मोठा आधार वाटत आहे. कोरोना संसर्ग च्या पार्श्वभूमीवर खबरदारी चा उपाय म्हणून दुकानदार बाबुआप्पा साळेगांवकर यांच्या वतीने कार्डधारकांना हात स्वच्छ करण्यासाठी हँडवाँश व सँनीआयझर्र ची व्यवस्था केली या शिवाय ग्राहकांना सोशल डिस्टन्स मुळे जास्तवेळ उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी शामीयांना देऊन सावलीची व्यवस्था केली होती याउपक्रमाचे उपविभागीय अधिकारी पारधी यांनी कौतुक केले.