धक्कादायक; नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ
आज ३२ कोरोना बधितांची भर तर ३ रुग्णांचा मृत्यू
नांदेड – नांदेड जिल्ह्यात लॉक डाऊन केल्यानंतर काल गुरुवारी रुग्णांच्या संख्येत घट होऊन ती संख्या ११ वर आली होती , परंतु आज पुन्हा कोरोना बधितांच्या संख्येत वाढ झाली असून ती संख्या ३२ वर पोहोचली आहे तर २४ तासात ३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे त्याचबरोबर सकारात्मक बातमी म्हणजे ३० रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना आपापल्या घरी रवाना करण्यात आले आहे
आजच्या एकूण 255 अहवालापैकी 182 अहवाल निगेटिव्ह आले असून जिल्ह्यात एकुण बाधितांची संख्या आता 775 एवढी झाली आहे तर यातील 469 बाधित बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे, जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या बाधितांची संख्या आता 43 एवढी झाली आहे.
नांदेड जिल्ह्यात 264 पॉझिटिव्ह बाधितांवर औषोधोपचार सुरु असून त्यातील 20 बाधितांची प्रकृती गंभीर स्वरूपाची आहे. आज रोजी 523 स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, त्यांचे अहवाल उद्या संध्याकाळी प्राप्त होतील.
कोरोना संदर्भात जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती न बाळगता अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ निलकंठ भोसीकर यांनी केले आहे.