धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 14 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 36
परभणी, प्रतिनिधी – जिंतूर तालुक्यातील सावंगी (भांबळे) येथील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. आता याच पार्श्वभूमीवर रविवारी दि.24 रात्री कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने 14 रुग्णांची भर पडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेने प्रशासन खडबडून जागे झाले असून संबंधित सर्व परिसर सील करण्यात आला आहे.
आज नव्याने आढळलेल्या १४ रुग्णांत ११ गंगाखेड तालुक्यातील, २ परभणी तालुक्यातील, १ सेलू तालुक्यातील असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली. जिल्ह्यातही प्रचंड अस्वस्थता पसरली.
कुठे आढळले रुग्ण
परभणी शहरातील पोलीस वसाहत बिल्डींग क्रमांक १९
परभणी तालुक्यातील मौ. माळसोन्ना
सेलु तालुक्यातील मौ. ब्रम्हवाकडी
गंगाखेड तालुक्यातील मौ. माखणी व नागठाणा
रविवारी सकाळपासून शासकिय अधिकारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून कधी अहवाल प्राप्त होतो या प्रतिक्षेत होते. रविवारी दिवसभरही अहवाल प्राप्त झाला नाही. रविवारी प्रलंबित स्वॅबची संख्या दोनशेंवर पोहचली होती. या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
शुक्रवारी मध्यरात्री नांदेड येथील प्रयोगशाळेमार्फत प्राप्त अहवालानुसार सावंगी (भांबळे) येथील एक महिला व परभणीतील एका तरूणीचा स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. परिणामी कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत आणखीन दोनने वाढ झाली. ती संख्या 22 पर्यंत पोहचली. त्यातच सावंगी येथील संशयित महिलेचा शुक्रवारी सायंकाळी मृत्यू झाला. अन् मध्यरात्री ती महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त झाला.
परभणीतील आकडेवारी आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत
आजपर्यंत एकूण १९२१ स्वॅब तपासणीसाठी पाठवले.
यापैकी १६१७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
त्यापैकी २३८ प्रलंबित आहेत.
तसेच २२ नमुने अनिर्णायक स्वरुपातील आहेत.
…हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
खळबळजनक… बीडमध्ये तिहेरी हत्याकांड; महिलेसह दोन मुलांची हत्या