धनगर समाज आरक्षण अंमलबजावणीसाठी दुचाकी यात्रा

तुळजापुरातून शनिवारपासून शुभारंभ: संयोजक विष्णु सायगुंडे यांची माहिती

0 101

परभणी,दि 15 (प्रतिनिधी)ः
आपला हक्क मिळवुया परत एकदा आरक्षणाची मशाल पेटवुया, अशी हाक देत धनगर समाजाची मोटार सायकल यात्रा आयोजित केली आहे. शुभारंभ दि. 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. श्री क्षेत्र तुळजापुर येथून करण्यात येणार आहे. त्यानंंतर ही दुचाकी यात्रा  संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात जाणार आहे, अशी माहिती  संयोजक विष्णू सायगुंडे यांनी दिली आहे.
कित्येक वर्षापासून धनगर समाज आपल्या हक्काच्या अनुसुचित जमातीच्या (एस.टी) आरक्षणासाठी संघर्ष करीत आहे. पण केंद्रात व महाराष्ट्रातील सरकार हे धनगर समाजाच्या आरक्षणासाठी वेळकाढू धोरण अवलंबीत आहे. सन 2014 मध्ये तत्कालीन भाजपचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीच्या उपोषणास्थळी भेट देऊन सांगतले होते की, जर महाराष्ट्र भाजपची सत्ता आल्यानंतर पहिल्याच कॅबीनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असे अश्वासन दिले होते. पण सत्तेत आल्यानंतर परत धनगर समाजाची फसवणुक भाजप सरकारने केली. गेल्या 60 ते 70 वर्षापासून प्रत्येक राजकीय पक्ष धनगर समाजाची फसवणुक करीत आहे. हे कुठ पर्यंत असेच चालू द्यायचे यासाठी या दुचाकी  यात्रेचे आयोजन करून सर्व समाजाला एकत्र करून व 288 आमदारांना निवेदन देऊन विनंती करण्यात  येणार आहे. वरिष्ठ नेत्यांना सांगून तो प्रश्न मार्गी लावावा व आपण हा मुद्दा विधानसभेत प्रामुख्याने मांडावा ही विनंती करण्यासाठी या दुचाकी यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेमध्ये सर्व समाज बांधवांनी सहभागी व्हावे.  घटनेने आरक्षण दिले आहे. पण सत्ताधारी कोणताही पक्ष असो ही सर्व पक्ष धनगर समाजाची दिशाभूल करीत आहेत. असंख्य मोर्चे,आंदोलने,लाँगमार्च,धरणे आंदोलन झाली पण समाजाच्या पदरात काहीच पडले नाही.  या दुचाकी  यात्रेत सकल धनगर समाजातील युवकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन सकल धनगर समाज, महाराष्ट्रच्या वतीने करण्यात आले  आहे.

यात्रेचा मार्ग व शहर प्रारंभ :उस्मानाबाद,तुळजापुर,नळदुर्ग,उमरगा,निलंगा,देवणी,उदगीर, लातूर, चाकुर,शिरूरताज, अहमदपुर, माळेगाव,लोहा-कंधार,मुखेड, देगलूर नायगाव, मुखेड, भोकर, हदगाव, वारंगा फाटा, कळमनुरी,हिंगोली,औंढा (ना.),चौंडी,वसमत,परभणी, गंगाखेड, परळी (वै),अंबाजोगाई, केज,नेकनुर, बीड, गेवराई, वडीगोद्री, अंबड, घनसावंगी, परतूर,वाटूर,जालना,टेंभुर्णी, भोकरदन,सिल्लोड, भराडी,कन्नड, वैजापुर, गंगापुर, पैठण,वाळूज औरंगाबाद येथे समारोप होईल.

error: Content is protected !!