नगरसेवकांकडून स्वच्छतेकडे दुर्लक्ष नव्वद हजारांचा पूल नऊ दिवसांत खड्ड्यात
संभाजीनगरातील व्यथा : रस्ता , नाल्या नाहीत तर प्यायला पाणीही नाही
माजलगांव, प्रतिनिधी:- शहरातील संभाजी चौक शेजारी असलेल्या संभाजीनगर भागामध्ये दोन महिन्यांपूर्वी नगर पालिकेने पुल बांधला होता . यावर ९० हजार रूपये खर्च केला , पूल अवघ्या नऊ दिवसांतच फुटल्याने व नाल्या तुंबल्याने घाण पाणी रस्त्यावर येत आहे .
या भागातील नागरिकांवर या पुलावरून जाण्याशिवाय पर्याय उरला नाही . नगरसेवकांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या ठिकाणी रस्ता व नाल्या नाहीत . नागरिकांना पार्टपलाईन अभावी पिण्याचे पाणी मिळणे मुश्कील झाले आहे . त्यामुळे नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत . कोट्यवधींचा विकास निधी पालिकेकडे आलेला असताना विकास असताना या भागातील नागरिकांना नगरपालिकेकडून कसल्याही मुलभूत सुविधा पुरविल्या जात नाहीत .
पावसाळा सुरु झाला असून , या भागामध्ये नाल्या नसल्याने पावसाचे येणारे पाणी रस्त्यावर जमा झाल्याने डबके व तळे साचले आहे . यामुळे विषारी साप , विंचू यांचा खुलेआम वावर वाढला आहे . साचलेल्या या पाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे . यातून अनेकांना साथ रोगाने ग्रासले आहे . कोरोनाच्या या भयावह संकटातुन सावरता – सावरता नागरिक त्रस्त झाले आहेत मात्र पालिका प्रशासन , नगरसेवकांच्या उदासिनतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे .
नागरिकांच्या मागणीकडे पालिकेचे दुर्लक्ष माजलगांव नगरपालिका ही भाजपच्या ताब्यात असताना व संभाजीनगरमध्ये भाजपचे नेते रमेश आडसकर व भाजप तालुकाध्यक्ष अरुण राऊत राहतात व त्यांना देखील या घाणीतूनच वावर करावा लागत आहे . नगरपालिका प्रशासन व नगरसेवकांच्या चुकीमुळे हा त्रास होत आहे . त्यांना देखील नागरिक असुविधेबाबत प्रश्न विचारत आहेत . नगरपालिका ताब्यात असताना त्यांना देखील खाली मान घालून सर्व पहात राहण्याची वेळ आली आहे .
पेट्रोल @ ९ ० रुपये लिटर सामान्यांचे कंबरडे मोडले
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});