नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना पुन्हा दिलासा
माजलगांव, (प्रतिनीधी):-माजलगांव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना पुन्हा दिलासा मिळाला आहे . त्यांच्यावरील अविश्वास प्रस्तावासह अन्य तक्रारींबाबत जिल्हाधिकारी यांच्यासमोर आज ( दि .१२ ) होणारी बैठक रद्द करण्यात आली असून पुढील सुनावणी दि .१६ जून रोजी होणार आहे , अशी माहिती विभागातील सुत्रांनी दिली आहे .
कोरोना काळातही माजलगांव नगरपरिषदेतील पदाधिकाऱ्यांचे राजकारण सुरुच आहे . नगरपरिषदेतील १८ नगरसेवकांनी नगराध्यक्ष सहाल चाऊस हे मनमानी पद्धतीने काम करत असल्याचा आरोप करत अविश्वास प्रस्ताव आणला होता . त्यावर दि .४ जून रोजी बैठक होणार होती , परंतु न्यायालयाने चाऊस यांना दिलासा दिला होता .
निर्देशानुसार जिल्हाधिकारी यांनी आज ( दि .१२ ) अविश्वास प्रस्तावासह सतत गैरहजर राहत असल्याबाबत सुनावणी ठेवली होती . परंतु स्वतः जिल्हाधिकारी हेच सेल्फ क्वारंटाइन असल्याने त्यांनी आजची सुनावणी रद्द करत पुढील सुनावणीसाठी दि .१६ जून तारीख निश्चित केली आहे . त्यामुळे नगराध्यक्ष सहाल चाऊस यांना मोठा दिलासा मिळाला आहे .
पावसाची हजेरी , कृषी दुकानांवर शेतकऱ्यांची गर्दी
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});