नगर पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष, शहरात विनामास्क फिरणारे दिवसेंदिवस ‘सैराट’

0 90

माजलगांव, प्रतिनिधी – शहरात दिवसेंदिवस विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वाढ होत असताना याकडे मात्र नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे . न.प. कर्मचाऱ्यांकडून मागील दीड महिन्यात बिनामास्क फिरणाऱ्या एकाही व्यक्तीवर कारवाई करण्यात आलेली नाही .

माजलगांव शहर व परिसरात पहिल्या व दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये नागरिकांनी सर्व प्रकारची काळजी घेत वारंवार हात धुणे , सतत मास्क लाऊन फिरणे , इतर लोकांचा संपर्क टाळणे , बाहेरून आणलेल्या वस्तु धुणे हे करत होते . त्याच दरम्यान नगरपालिका प्रशासनाने रस्त्यावर कोणी विनामास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड करण्यास सुरुवात केली होती व दंड न भरणाऱ्यांना उठकबैठक करण्याची सजा दिली जात , असे परंतु तिसऱ्या लॉकडाऊनंतर नगरपालिका कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष करत बिनामास्क फिरणाऱ्यांवरील दंड वसुली थांबवली . सुरुवातीला तालुक्यात कोरोनाचे रूग्ण सापडले नसले तरी मे महिन्यात अचानक माजलगांव तालुक्यातील हिवरा बु . ,कवडगावथडी व नित्रूड या ठिकाणी १५-१६ सण सापडले . या ठिकाणचे सर्व रूग्ण बरे होऊन घरी पोहोचल्यानंतर तालुक्यात एकही रुग्ण सापडला नसल्याने नागरिकांमधील भितीचे वातावरण संपत गेले व संपूर्ण तालुक्यात पहिल्यासारखे नागरिक हिंडत फिरत आहेत.सध्या तालुक्यात ८० टक्के नागरिक हे विनामास्क लावता फिरत असून , एकमेकांच्या संपर्कात बिनधास्त येत आहेत तर भाजीपाला व फळ विक्रेते विनामास्क व विना ग्लोज व्यवहार करत असताना नगरपालिका प्रशासनाचा याकडे दुर्लक्ष असून , एखादा कोणी कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेला असेल तर रुग्ण संख्या वाढायला वेळ लागणार नाही .

नागरिकांनी विनामास्क फिरणे धोकादायक असून , सर्वानी मास्क लावूनच बाहेर फिरायला हवे व एकमेकांचा संपर्क टाळल्यास कोरोनापासून आपण वाचू शकू .
– डॉ . गजानन रुद्रवार , प्रभारी वैद्यकीय अधीक्षक

विनामास्क फिरणाऱ्या ६०० पेक्षा जास्त लोकांकडून दंड वसूल केला आहे . यातून जवळपास ५० हजार रुपये नगरपालिकेने दंड वसूल केला असून , इतर कार्यालयीन कामांमुळे काही दिवस कारवाया यांबवण्यात आल्या होत्या , त्या कारवाया पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत .
-आशिष तुसे , नगरपालिका कर्मचारी व पथक प्रमुख

READ THIS – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
READ MORE – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट



error: Content is protected !!