नाभिक समाजास दुकाने सुरु करून दिलासा द्यावा – खा.डॉ.भारती पवार

0 83

नाशिक – कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले असताना नागरिकांना दैनंदिन जीवनमान सुखकर करण्यास अडचणी येत असल्यामुळे बिकट होत चाललेल्या आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी लॉकडाऊन दरम्यान सर्व व्यावसायिकांना आपापले दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली असताना केवळ सलून व्यवसायाला अद्यापही परवानगी देण्यात आली नसल्याने जिल्ह्यातील नाभिक समाजातर्फे ठिकठिकाणी निषेध आंदोलने करण्यात येत असताना दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांची भेट घेऊन सलूनची दुकाने सुरु करणेसाठी निवेदन दिले आहे. यावर खासदार डॉ. भारती पवार यांनी याविषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. त्यात त्यांनी नाभिक समाजाकरिता सलून व्यवसाया व्यतिरिक्त दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांचेवर पूर्णतः उपासमारीची वेळ ओढवली आहे.

ह्या कोरोना विषाणू महामारीतून सावरण्याकरिता नाभिक समाजाच्या हिताचा व त्यांच्यावर आलेल्या आर्थिक संकटाचा गांभीर्याने विचार करून त्यांचे उपजीविकेचे साधन म्हणून पुन्हा सलूनची दुकाने त्यांचे सर्व जबाबदारी व नियम अटीशर्तीच्या आधारे सुरु करण्यास परवानगी देऊन दिलासा देणेकामी विचार व्हावा यासाठी खा.डॉ.भारती पवार यांनी सर्व नाभिक समाजाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांचेकडे मागणी केली आहे.



error: Content is protected !!