निसर्ग वेध मित्र मंडल व भायुसंपचा वृक्षमय ध्येय वेडा …चेतन काले

0 129
  • वृक्षरोपन करुन करतोय जन्मदिन, लग्नाचा सोहला, मृत्यु संस्कार साजरा।। अँड. सागर हेमके स्मृति वर्ष म्हणून सेवा संकल्प.. 

हिंगणघाट, प्रतिनिधी – स्थानिक शहरातील वृक्षमय ध्येयवेडा युवा चेतन काले हा निसर्ग वेध मित्र मंडल तथा भारतीय युवा संस्कार परीषदेचे माध्यमातून मागिल पाच वर्षापासून स्व. अँड.सागर हेमके यांचे सानिध्याने वृक्षारोपणांचे कार्य नेटाने करीत आहे. याच वर्षी २५ जानेवारीला निसर्ग वेध मित्र मंडलाचे हिंगनघाट शहराचे संस्थापक युवा अँड. सागर हेमके यांचे आकस्मिक निधन झाल्याने चेतन काले यांनी त्यांच्या स्मृति जपण्यासाठी वृक्षमय वृक्षारोपणांने सेवामय संकल्प अंगी बाणला.

चेतन हा एक चेतनशील कार्य सिध्द करण्यासाठी आपल्या स्व:खर्चातून मोलमजूरी करुन चिंकू, फणस, निम, वड, बदाम,आंबा यासारखे वृक्ष विकत घेऊन कुणाचेही लग्नादि, वाढदिवसाच्या प्रसंगी, जन्मदिन, मृत्यु संस्कार यासारखे अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमात वृक्षारोपणांने दिनोत्सव साजरा करीत असतो…. दिवसेदिवस मानव जातीचे निसर्गावरील अतिक्रमण वाढत आहे त्यामुळे निसर्ग वेळोवेळी आपले रौद्र रुप दाखवीत असतो. तसेच वातावरण प्रदुषित झाल्याने कोरोनाचे प्रादुर्भाव अधिक वाढीत आहे मानवाने यापासुन धड़ा घेण्याची गरज असुन निसर्ग हाच मानवाचा मोठा गुरु आहे हे गुरुत्वाकर्षण वाढीसाठी वृक्षारोपन करुन त्याचे संवर्धन करण्याचे कार्य हा चेतन काले करीत आहे.

घरची परिस्थिति बेताची तरीही ध्येयसिद्धि मानवीय सृष्टिची, मग स्वयं झाडाला रोपीत करण्यासाठी खड्डे तयार करण्यापासून तर त्याचे संवर्धन कठडे उभारणे पर्यन्त व्यवस्था करतो. त्यानंतर त्या वृक्षाला पाणी देणे देखभाल करण्यासाठी मोलमजूरी करुन आल्यावर आपली सेवा देत असतो.त्यांनी अँड. हेमके यांचे संकल्पनेतील आमराई पार्क इंदिरा गांधी वार्ड मध्ये उभा करण्यात मोलाचा सहभाग घेतला होता. या सोबतच तो मुलांना वाचनाची सवय लागावी म्हणून गोष्ठी चे पुस्तक, विचार भारती पुस्तकें घरपोच वाचनालय सेवा सुध्दा देत असतो.

हे कार्य तो विना मोबदला करीत असतो. यांचे मदतीला भारतीय युवा संस्कार परीषदेच्या संरक्षक डाँ. उषाताई साजापुरकर, राष्ट्रीय स्वाभिमान आंदोलनाचे राष्ट्रीय महामंत्री प्रदीपकुमार नागपुरकर, अँड. रविन्द्र मद्दलवार, लहान बंधू सागर काले, सहकारी म्हणून उभे राहतात तर निलेश बकाने,प्रज्योत रेडलावार, वैष्णव मुंगले, पारस टालवेकर, सौरभ खेलकर, गौरव कुराडे, रुपेश बकाने, हे खाद्यांला खांदा लावून सोबत असतात. चेतनच्या ह्या कार्यास वटवृक्षा सारखे सावलीमय फांद्या म्हणून सहयोग साथ देतात.

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!