न्यायालय परिसरातून दुचाकी चोरीला
पालम :- पालम शहरातील भरवस्तीत असलेल्या न्यायालय परिसरातून चोरट्यांनी रविवारी रात्री दुचाकी लांबवली. माधवराव फाजगे यांच्या मालकीची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्लस , एम.एच.22, ए.ई.6807 ही गाडी नेहमी प्रमाणे घरासमोर लावून घरी झोपायला गेले असता रविवारी राञी 11 ते 1 दरम्यान गाडी चोरीला गेली असल्याचे समजले. त्याच दरम्यान येणार्या पोलिसांच्या गस्ती वाहनाला सदरील गाडी चोरीची माहिती कळताच ए.एस.आय सुभाष आगळे यांनी आजुबाजुच्या परिसर तसेच केरवाडी पर्यंत शोध घेतला परंतु गाडी सापडली नाही.नंतर तिन दिवस इतरञ शोध घेतला असता कुठेच गाडीचा ठावठिकाणा लागत नसल्याने त्यांनी रितसर पालम पोलिस ठाण्यात शुक्रवारी 24 एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय दंड संहिता 1860 नुसार अज्ञाताविरूद्थ कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे आहे.
पालमच्या मध्यवर्ती भागात व लाॅकडाऊनच्या संचारबंदी च्या काळात, सध्या सगळ्या रस्त्यांची नाकेबंदी केली असतानाही चोरीच्या घटनेमुळे नागरीकात भितीचे वातावरण तयार झाले आहे.