पंचरत्न फारमर्स प्रोड्युसर कंपनी मार्फत पानेवाडी नागापूर येथे खते व बियाणे पुरवठा

0 178

नांदगाव ,प्रतिनिधी – मनमाड शहरापासून काही अंतरावर असलेले नागापूर व पानेवाडी येथील कृषिमंत्री नामदार श्री.दादाजी भुसे यांच्या संकल्पनेतून नागापूर पानेवाडी येथे बांधावर खत व बियाणे पुरवठा कार्यक्रमांतर्गत पंचरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत मका बियाणे पन्नास क्विंटल व 15 टन युरिया खताचा शेतकरी सभासदांना पुरवठा करण्यात आला.

सध्या मनमाड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळल्याने शेतकऱ्यांना कोरोना पासून मुक्त ठेवणे मनमाड शहरातील गर्दी रोखणे यासाठी पंचरत्न फार्मर प्रोड्युसर कंपनी मार्फत सभासदांची बियाणे व खते याची मागणी घेण्यात आली.

यामध्ये युरिया, व 10-26-26 खते, तसेच मका बियाणे,बाजरी बियाणे, अशी मागणी शेतकऱ्यांनी नोंदवली त्याअंतर्गत कंपनीचे अध्यक्ष श्री दत्तू मामा सोनवणे, सचिव बाळासाहेब पाटील, कंपनी व्यवस्थापक सचिन शिलावट, संचालक श्रीराम क्षीरसागर यांचे पुढाकाराने मागणी मांडली त्याप्रमाणे जिल्हा परिषद नाशिक कृषी विकास अधिकारी श्री रमेश शिंदे साहेब, कृषी अधिकारी श्री विजय धात्रक, तालुका कृषी अधिकारी श्री जगदीश पाटील सर , कृषी-सहाय्यक आर आर आहिरे यांचे मदतीने खताची मागणी बुक केली.

आज दिनांक 15 जून रोजी युरिया खताची पंधरा टनाची गाडी उपस्थित शेतकरी नवनाथ अंबादास पवार, अशोक रंगनाथ पवार, माधव पवार, बाळासाहेब सयाजी पवार, सुधाकर दगू पवार, राजेंद्र सयाजी पवार(झेडपी), जालींदर सोमासे, संतोष अशोक शिलावट, रतन साळुंखे, संजय हरी पवार, गोरख पवार, संतोष लक्ष्मण पवार, शिवलाल शिलावट, सुकदेव झाल्टे, नागू पवार, कौतीक पवार, यांना वाटप केली असून दोन दिवसात 10-26-26 खत देखील उपलब्ध होणार आहे.

अशी करा सोयाबीन पिकाची लागवड

 

error: Content is protected !!