पगार येतो १८ ते २२ हजार पण, हातात पडतो केवळ ११ हजार

0 179

शब्दराज ऑनलाईन,दि 29ः
पिंपरी चिंचवड मनपाच्या आरोग्य विभागातील कंत्राटी सफाई कर्मचारी महिला व पुरुष यांच्या पगारातून बायबॅक पद्धतीने ठेकेदार रक्कम वसूल करतात वरील विषया बाबतीत अनेक त्तक्रारी रयत विद्यार्थी परिषदे कडे आल्या होत्या या संदर्भात अधिक समजून घेण्या साठी रयत चे पदाधिकारी तिथे पोहचले असता अने गंभीर बाबी उघडकीस आल्या आहेत.

रयत विद्यार्थी परिषदेने चौकशी केली असता या बाबी लक्षात आल्या की पिंपरी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयात ठेकेदाराकडे सफाई कर्मचारी अकुशल व कुशल कर्मचारी असे 1600 कामगार काम करतात. पालिकेने या कामगारांसाठी किमान वेतन निश्चित केले आहे. सफाई कामगारांना एकूण वेतन 18200₹,अकुशल कामगारांना 22000 ₹ तर कुशल कामगारांना 24000 ₹ वेतन आहे .मात्र संबंधित ठेकेदाराकडून त्यांना किमान वेतन दिले जात नाही. आरोग्य विभागातील कंत्राटी महिला व पुरुष कामगारांना पगार म्हणून 11000 ₹ दिले जातात.क याबाबत जर कोठे तक्रार केली तर कामगार नोकरी जाण्याच्या भीतीने अन्याय सहन करीत आहे.
पिंपरी मनपा आरोग्य विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या कंत्राटी सफाई कर्मचारी महिला व पुरुष कचरावेचक घंटागाडी नाले सफाई कर्मचारी यांच्या हक्काचा पगार म्हणून दिनांक 20 ते 25 तारखेच्या दरम्यान संबंधित कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो कायद्याच्या नियमाच्या अनुषंगाने दरमहा दहा तारखेपर्यंत सर्व कर्मचारी यांच्या खात्यामध्ये रक्कम जमा होणे कायद्याच्या नियमानुसार बंधनकारक असते परंतु पिंपरी मनपाने या ठेकेदारास साठी संपूर्ण कायदा बदलल्याचे चित्र स्पष्ट होते जो पगार महिन्याच्या 10 तारखेपर्यंत मिळणे बंधनकारक असतो तो पगार महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वीस ते पंचवीस दरम्यान का मिळतो या संबंधित लेखी खुलासा पालिकेने करावा दुसरा महत्त्वाचा मुद्दा कोणत्याही कर्मचाऱ्याला त्याच्या बँक खात्यावर जमा झालेल्या हक्काचा पगार संबंधित पिंपरी शाखेतील बँकेत जाऊन काढावा लागतो इतर बँकेच्या कोणत्याही शाखेत काढण्याची मुभा नाही किंवा हक्काचा पगार कोणत्या शाखेतून किंवा कधी काढायचा हा सर्वस्वी अधिकार या खातेदाराचा परंतु ठेकेदार सोबत झालेल्या करारनाम्यातील चुकीच्या जाचक अटी आणि शर्ती मुळे कामगारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारी गंभीर बाब आहे. अटी शर्ती नियमांच्या काही जाचक अटींचा फायदा संबंधित ठेकेदार शुभम उद्योग यांनी उचलून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ड प्रभागातील सफाई कर्मचारी महिला व पुरुष यांना पिंपरी शाखेतील सिंडिकेट बँक (कॅनरा बँक सध्याची) बँकेत बोलून ठेकेदारामार्फत विड्रॉल स्लिप भरून घेतल्या जातात .
सदर ठेकेदारांची व्यक्ती तिथे थांबून हे काम करून घेते … रयत विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सरोदे , सचिव रविराज काळे , अक्षय कोथिंबीरे यांनी सदर गोष्टीचा पाठपुरावा केला .
तसेच यावर लवकरात लवकर कारवाई करावी नाहीतर आंदोलनाला सामोरे जा असा इशारा रयत कडून देण्यात आला आहे ..

error: Content is protected !!