पत्रकार संरक्षण समितीच्या खेड तालुकाध्यक्षपदी दिनेश कु-हाडे पाटील यांची निवड
आळंदी,दि 21 (प्रतिनिधी)ः ना जातीसाठी, ना मातीसाठी लढाई फक्त पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी …. हे ब्रिदवाक्य घेवून कार्य करणाऱ्या ‘ पत्रकार संरक्षण समिती ‘ ने खेड तालुका अध्यक्षपदाची धुरा दैनिक शब्दराजचे प्रतिनिधी दिनेश कु-हाडे पा. यांच्या खांद्यांवर सोपवली आहे.
पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांच्या आदेशावरून पुणे जिल्हाध्यक्ष नाथाभाऊ उंद्रे यांच्या हस्ते आळंदीचे पत्रकार दिनेश कु-हाडे पा. यांची खेड तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आले आहे.
भारतीय सविधनाला अभिप्रेत शाश्वत विकासासाठी, सामाजिक न्याय व हक्क यांच्या साठी हि संघटना काम करत असून प्रशासकीय बेजाबाबदारी, अन्याय, भ्रष्टाचार, अवैध धंदे, पत्रकारांवर होणारे हल्ले, गोर गरीबांवर होणारा अत्याचार याविरोधात ही संघटना राज्यभर काम करत आहे.
संघटनेने माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. तो मी सार्थ करेल असे मत नवनिर्वाचित अध्यक्ष दिनेश कु-हाडे यांनी व्यक्त केले. त्यांच्या नियुक्ती बद्दल आळंदी आणि परिसरात स्वागत करण्यात येत असून त्यांचे या निवडी बाबत कौतुक करण्यात आले आहे.
त्यांच्या निवडीबद्दल खेडचे आमदार दिलीप मोहिते, पुणे जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे, पंचायत समिती सभापती भगवान पोखरकर, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, निवृत्त पोलिस संघटनेचे सचिव संपतराव जाधव, सरपंच नामदेव जाधव,ज्येष्ठ पत्रकार महादेव पाखरे, विलास काटे, अर्जुन मेदनकर, विठ्ठल शिंदे, श्रीकांत बोरावके, भानुदास प-हाड, अनिल जोगदंड, दादासाहेब करंडक आणि गायत्री ढवळे यांनी अभिनंदन केले.