परभणी, प्रतिनिधी – नुकताच परभणी येथील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्याला दवाखान्यात सुट्टी देण्यात आली व परभणी जिल्हा परत एकदा कोरोना मुक्त झाला होता. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत परभणीला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. परंतु आज परभणी जिल्ह्यातील सेलू शहरात कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने सेलू तीन दिवस कडकडीत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी दी.म. मुगळीकर यांनी काढले आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
सदरील आदेश हे सेलू नगरपरिषद हद्द आणि 3 किमी परिसरात दि. 29 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून ते दिनांक 01 मे च्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहेत.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा
केवळ यांना मिळणार सवलत – या संचारबंदीतून खालील व्यक्ती व समूहांना सूट राहणार आहे.
– सर्व शासकीय कार्यालये / त्यांचे कर्मचारी / त्यांचे वाहने / सर्व शासकीय वाहने
– सर्व शासकीय व खाजगी दवाखाने, सर्व औषधी दुकाने
– शासकीय निवारागृहे / कॅम्पमध्ये तसेच बेघर व गरजुंना अन्न वाटप करणारे सेवाभावी संस्था व त्यांची वाहने
– अत्यावश्यक सेवेसाठी परवाने घेतलेले वाहने व व्यक्ती
– वैद्यकीय आपात्काल व अत्यावश्यक सेवा
– पेट्रोल पंप वितरक, कर्मचारी व त्यांची वाहने
– प्रिंट मिडीया, इलेक्ट्रॉनिक मिडीया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वितरक
– गॅस वितरक व गॅस सिलेंडर घरपोच देणारे वाहन व त्यावरील कर्मचारी
– दुध विक्रेते (गल्ली, कॉलनी व सोसायट्यामध्ये घरोघरी जावून सकाळी 6 ते 9 या कालावधीत विक्री करावी. एका ठिकाणी थांबून विक्री करता येणार नाही.)
– खत वाहतूक त्यांचे गोदामे/दुकाने, त्याच्यासाठी लागणारी वाहने व कामगार.
– राष्ट्रीयीकृत बँका केवळ रास्तभाव दुकानदार यांचेकडून चलनाव्दारे पैसे भरणा करून घेणे या बाबीकरिता.
याशिवाय इतर कोणतीही व्यक्ती/वाहने रस्त्याने, बाजारामध्ये, गल्लीमध्ये, घराबाहेर फिरताना आढळून आल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे समजण्यात येईल आणि पुढील कारवाई करण्यात येईल.
आमच्या फेसबुक पेज ला लाईक करुन ताजे अपडेट मिळवण्यासाठी इथे क्लिक करा