परभणी जिल्ह्यात पुन्हा कोरोना रुग्ण वाढले
परभणी,दि 23 (प्रतिनिधी)ःजिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्या वाढली आहे.रविवारी (दि.23) जिल्ह्यात आज 540 कोरोना रुग्ण आढळले तर 8 रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यात एक दिवस कोरोना रुग्णांची संख्या कमी होताच दुसऱ्या दिवशी चार पटीने वाढत आहे.शनिवारी रुग्ण संख्या 220 एवढी होती.आता रविवारी पुन्हा वाढली.आजचे कोरोनाबाधित :540 एवढे असून आजचे मृत्यू पावलेले रुग्ण :8 आहेत.तर आजचे कोरोनामुक्त रुग्ण :108 एवढे आहेत.सध्या जिल्ह्यात आज रोजी उपचार घेणारे :3409 एवढे आहेत.
आतापर्यंतचे रुग्ण :48401
आतापर्यंतकोरोनामुक्त :43794
आतापर्यंतचे मृत्यू :1198