परळीत पाच कृषि सेवा केंद्रांना ठोकले सील; महसूल पोलीस न पा प्रशासनाची संयुक्त कारवाई
परळी, प्रतिनिधी – परळी शहरातील एसबीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये कोरोना संसर्ग आढळून आल्यानंतर बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी परळीत 5 जुलै ते 12 जुलै दरम्यान संचार बंदी आदेश लागू केले असून या आदेशाचे उल्लंघन करत शहरातील 5 कृषी केंद्रांनी आपली आस्थापने अनधिकृतरित्या उघडल्याचे निदर्शनास आल्याने येथील महसूल, पोलीस व न पा प्रशासनाने संयुक्त कार्यवाही करत 5 कृषी सेवा केंद्रांना सील ठोकले आहे.
याबाबत माहिती अशी की येथील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेतील कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर कोरोना चा प्रादुर्भाव अधिक वाढू नये या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या आदेशानुसार परळी शहर व शहरालगतच्या काही गावांमध्ये संचारबंदी लागू केली आहे या संचार बंदीचा काळ 5 जुलै ते 12 जुलै असा आहे दरम्यान शहरांमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता कुठलेही आस्थापने उघडे ठेवण्याची परवानगी नसूनही येथील मोंढा मार्केट याठिकाणी अनधिकृत रित्या 5 कृषी सेवा केंद्रांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांचे उल्लंघन करत अनाधिकृत रित्या आपली कृषी केंद्र उघडे ठेवल्याचे निदर्शनास आल्यानंतर महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व व नगरपालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी भेटी देत मोंढा परिसरातील (1)विष्णू ट्रेडर्स (2)वैद्यनाथ ऍग्रो एजन्सीज(3)गोपाळकृष्ण कृषी सेवा केंद्र(4)न्यू श्रीराम फर्टिलायझर्स (5)कोमल फर्टिलायझर्स अशा 5 कृषी सेवा केंद्रांना सील ठोकून त्यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
या कार्यवाहीसाठी महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार बाबुराव रुपनर तलाठी राजूरे भुसेवाड तथा शिनगारे न पा चे कार्यालयीन अधीक्षक संतोष रोडे बालाजी कारले सचिन पोकळे तसेच पोलीस प्रशासनाच्या 20 हून अधिक कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.