परळीत राष्ट्रवादीकडून आ. पडळकरांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध!
पडळकरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
परळी : भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांच्या वैचारिक दिवाळखोरी दाखवणाऱ्या वक्तव्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाली आहे, परळीत सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन आ. पडळकरांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असून त्यांचे विधान परिषद सदस्यत्व रद्द करण्यासाठीही प्रयत्न करणार असल्याचे परळी राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात आले आहे.
एका गाढवाच्या गळ्यात ‘मी गोपीचंद पडळकर’ असा फलक लावून कार्यकर्त्यांनी येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर परिसरात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनीही ट्विट करत ‘सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका’ असे म्हटले आहे. राजकारणात नेम अँड फेम मिळवायचे असले की पवार साहेबांवर टीका करायची, झटपट प्रसिद्धी मिळते, असं समजून अनेकजण ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशा उचापती करत असतात. सूर्यावर थुंकण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा डिपॉझिट आणि अस्तित्व टिकुन राहील, देवादिकांच्या खोट्या शपथा घ्यायची पाळी येणार नाही, याकडे लक्ष द्यावे. बिरोबा अशांना सद्बुद्धी देवो! अशा शब्दात ना. मुंडेंनी पडळकरांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.
पडळकरांची ही कृती सबंध महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिमा फासणारी असून भाजप कडून द्वेष आणि सूडबुद्धीने प्रतिक्रिया देणे सुरू आहे. पडळकरांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असून त्यांचे विधान परिषदेचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करणार असल्याचेही परळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी माजी नगराध्यक्ष व नगर परिषद गटनेते वाल्मिक अण्णा कराड,शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी,युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ.संतोष मुंडे,जि.प.सदस्य प्रा.डॉ.मधुकर आघाव सर,उपनगराध्यक्ष शकील कुरेशी,राष्ट्रवादीचे नेते वैजनाथराव सोळंके,रमेश भोयटे,रविंद्र परदेशी,माधवराव ताटे,माजी नगराध्यक्ष जाबेर खान पठाण, नगरसेवक अय्युब पठाण,गोपाळ आंधळे,अनिल आष्टेकर,श्रीकांत ढेले,विजय भोयटे,वैजनाथ बागवाले,राजेंद्र सोनी,खा.शरद पवार विचार मंचचे जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख,शंकर आडेपवार,चेतन सौन्दळे,सरचिटणीस अनंत ईंगळे,शंकर कापसे,महेंद्र रोडे,स्वप्नील वेरुळे,संजय देवकर,के.डी.उपाडे,केशव गायकवाड,शेख शम्मो,अल्ताफ पठाण,गफार काकर,बळीराम नागरगोजे,लालाखान पठाण,शेख मुख्तार सेठ,शरद कावरे,जयदत्त नरवटे,रामदास कराड,मोहन साखरे,अनंत ढोपरे,डी.जी.मस्के,शशी बिराजदार, राज जगतकर,अमर रोडे,प्रताप समीदरसावळे,सुरेश नानावटे, गिरीष भोसले,माऊली होळबे,धम्मा जगतकर, गुलाबभाई,श्रीहरी शेप,विश्वजीत कांबळे, तक्की खान,प्रतीक बद्दर यांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते, या निषेध आंदोलनाच्या वेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचेही पालन करण्यात आले.
आज मनमाड येथे गोपीचंद पडळकर यांच्या प्रतिमेस जोडे मारून निषेध करण्यात आला
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});