परळी एसबीआयच्या संपर्कातील तब्बल 534 लोकांचे घेतले स्वॅब

1 124

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्वॅब घेण्याची पहिलीच वेळ

परळी, प्रतिनिधी – शहरातील एसबीआय बँकेच्या मुख्य शाखेतील काही कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बँकेतील कर्मचारी व त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवरती प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून संसर्ग आटोक्यात ठेवण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गेल्या 25 जून 2020 पासून बँकेच्या संपर्कात आलेल्या शहरी व ग्रामीण भागातील जवळपास 1500 लोकांची कोरोनाची टेस्ट आरोग्य प्रशासनाच्या वतीने करन्याचे निश्चित झाले असून याच पर्शवभूमीवरती आज दि 10 जुलै रोजी शहरातील तब्बल 534 व्यक्तींचे स्वॅब घेऊन अंबाजोगाई येथील कोव्हीड 19 टेस्टिंग सेंटरला तपासणीसाठी पाठवण्यात आले.

याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील एसबीआयच्या मुख्य शाखेतील काही कर्मचारी कोरोना बाधित आढळल्यानंतर आरोग्य विभागाने बँकेमध्ये आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग पूर्ण केले आहे. 25 जून 2020 नंतर शहर व ग्रामीण भागातील जवळपास 1500 लोकांचा व्यवहाराच्या व इतर कामांच्या निमित्ताने बँकेशी संपर्क आला आहे. त्यानंतर बँकेचे काही कर्मचारी त्यांचे कुटुंबीय व ग्राहक कोरोनाग्रस्त आढळल्यानंतर आरोग्य प्रशासन अधिक सतर्क झाले असून समुह संसर्गाचा धोका निर्माण झाल्याने जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या आदेशानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांच्या मुख्य मार्गदर्शनाखाली याच संदर्भात महसूल आरोग्य व इतर अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली होती. उपविभागीय अधिकारी गणेश महाडीक,तहसिलदार विपीन पाटिल,नायब तहसिलदार बाबुराव रुपनर न.प.मुख्याधिकारी अरविंद मुंडे आदींसह प्रशासनाच्या विविध विभागांची मदत घेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे,उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांनी आज दि.10 रोजी एसबीआय बॅंकेशी संपर्कात आलेल्या 1500 जणांच्या स्वॅब तपासणीसाठी परळी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह येथे चार बुथ उभारली असुन दोन दिवसात या सर्वांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. यात प्रत्येक बुथ मध्ये एक प्रयोगशाळा तंत्रज्ञ व एका मदतनिसाची नियुक्ती करण्यात आली आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.दिनेश कुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड 19 नियंत्रण अधिकारी म्हणून डॉ.दत्तात्रय केंद्रे, डॉ.संतोष गुंजकर, डॉ.व्यकंटेश तिडके यांची नियु्नती करण्यात आली असून आज दि.10 जुलै रोजी परळी शहरातील तब्बल 534 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी दिली. याकामी न.प.मुख्याधिकारी अरविंंद मुंडे, कार्यालयीन अधिक्षक संतोष रोडे हे न.प.च्या माध्यमातून एसबीआय बँकेच्या संपर्कात आलेल्या शहरातील नागरिकांशी संपर्क साधण्याचे काम करत आहेत. तर ग्रामिण भागातील व्यक्तींचे स्वॅब घेण्यासाठी पंचायत समितीचे गटविकासअधिकारी संजय केंद्रे हे ग्रामसेवक आणि कर्मचार्‍यांच्या मार्फत ग्रामिण भागातील नागरिकांचे स्वॅब घेण्यासाठी तयारी करत आहेत.या प्रक्रियेदरम्यान आज आरोग्य विभागाच्या टीमने शहरातील तब्बल 534 लोकांचे स्वॅब घेऊन पुढील तपासणीसाठी अंबाजोगाई येथील कोव्हीड 19 टेस्टिंग सेंटरला पाठविले आहेत तर उर्वरित व्यक्तींचे स्वॅब उद्यापासून टप्याटप्याने घेण्यात येणार आहेत. दरम्यान अतिशय आव्हानात्मक असणारे हे कार्य येथील आरोग्य विभागाच्या टीमने शिस्तबद्ध पध्दतीन सुरक्षेचेे सर्व नियम पाळत पार पाडले असुन परळीतून पहिल्यांदाच एव्हड्या मोठया प्रमाणात स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.



error: Content is protected !!