परळी बाजार समिती च्या बाजूस थाटला कचऱ्याचा बाजार मुक्या जनावरांचे आरोग्य धोक्यात – प्रा.अतुल दुबे
परळी, प्रतिनिधी – परळी बाजार समिती च्या बाजूला ग्राउंड मध्ये प्लास्टिक कचरा पडलेल्या ठिकाणी अनेक गायी 6 वाजेनंतर उभे असल्याने सादर प्लास्टिक कचरा खात आहेत या आधी देखील गायीने प्लास्टिक कचरा खाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.
या बाबतीत वारंवार सुचना करून देखील नगरपरिषद चे काम वाऱ्यावर दिसून येत आहे सगळी कडे स्वच्छतेचे गुणगान आणि मुख्य बाजार समिती बाजूला घाण कचऱ्याचा ढीग मुळे नागरिकांच्या आरोग्यासह मुक्या जनावरांचे जीवाशी खेळण्याचा प्रकार दिसुन येत आहे. आता तरी नगर परिषद या प्लास्टिक कचऱ्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देतील का असा संतप्त सवाल शिवसेना,विध्यार्थी सेना बीड जिल्हाप्रमुख प्रा.अतुल दुबे यांनी केला आहे.
भारतात सर्वत्र कोरोना जे हाहाकार माजवला असून परळी नगर परीषद एकीकडे स्वच्छता अभियान चालवित आहेत तर दुसरीकडे स्वच्छता चे तीन तेरा नऊ आठरा वाजलेले दिसत आहे.मुक्या जनावरांच्या आणि परळीतील जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या काम चुकार करणाऱ्या व स्वच्छता विषयी खोटे बोलून वाजागाजा करणाऱ्या स्वछता टीम व नगरपरिषद ने त्वरित पाहणी करावी प्लास्टिक बंदी असतानाही नुसते नावालाच कार्यवाही दाखविणारे न.प.प्रशासनाचे गलथान कारभार समोर आले आहे प्लास्टिक बंदी मध्ये एवढा प्लास्टिक कचरा करणाऱ्या व्यापाऱ्यांना नोटीस द्या परळीतील जनतेच्या व मुक्या जनावरांच्या आरोग्याशी धोका होत असून त्वरोत या प्लास्टिक कचरा करणार्यांवर कडक कार्यवाही करून हा प्लास्टिक कचरा उचलण्यात यावा अशी मागणी प्रा.अतुल दुबे यांनी केले आहे.
स्वारातीला साडेनऊ कोटी नाही तर आता १७ कोटी रुपये किमतीची ‘३.० टेस्ला एमआरआय मशीन’ मिळणार!
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});