पावसामुळे अंतुर किल्ल्याकडे जाणारा रस्ता खचला.
पुरातत्व विभागाने लवकरात लवकर खचलेल्या रस्त्याचे काम करावे- दुर्गसेवक सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड.
कन्नड,प्रतिनिधी- संभाजीनगर जिल्ह्यातील ता.कन्नड येथे असलेल्या ऐतिहासिक अंतुर किल्ल्याकडे जाणार मार्ग खचला. सह्याद्री प्रतिष्ठान कन्नड विभागाच्या सदस्यांच्या निदर्शास आल्यावर त्वरित पुरातत्व खात्याशी दुर्ग संवर्धनविभागा मार्फत पत्रव्यवहार केला तसेच संस्थेचे कार्याध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी पुरातत्व खात्याच्या अधिकारी यांच्याशी फोनवर चर्चा करून त्यांना पत्र पाठविले. सह्याद्री प्रतिष्ठानने यापूर्वी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली किल्ल्यावर स्वछता मोहीमा तसेच सूचना फलक व दिशा दर्शक लावणे ही कामे केली असून दर दोन महिन्यांनी किल्ल्यावर दुर्ग दर्शन व मोहिमांचे आयोजन केले जाते.
पुरातत्व विभागाने किल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापासून ते पार्किंग पर्यंत सिमेंटचा रस्ता बांधला आहे त्यामुळे किल्ल्याकडे जाणे पर्यटकांना सुरक्षित होत असे…पण सध्या पावसामुळे हा रस्ता खचला असून किल्ल्याकडे जाणे धोक्याचे झाले आहे. पुरातत्व विभागाने रस्ता धोकादायक आहे असा फलक लावला असून काही पर्यटक तिथे जात आहेत तरी जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे तात्काळ हे काम करण्यात यावे असे विनंती पत्र सह्याद्री प्रतिष्ठानकडून देण्यात आले. अशी माहिती डॉ.पवन गिरी, शिवराज पाटील, डॉ.मनोज राठोड, भागवत निर्मळ, अरुण थोरात, जगदीश कंचार यांनी दिली.