पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील गणेशमूर्तींना आळंदी हद्दीत विसर्जनास बंदी
नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांचे पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाला निवेदन
आळंदी – पिंपरी चिंचवड महानगरपालिका तसेच आळंदी नगरपरिषदेच्या हद्दित कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आळंदी हद्दीतील इंद्रायणी नदीच्या घाटावर यावर्षी गणेश विसर्जन करण्यास बंदी घातली असून गणेशोत्सव काळात इंद्रायणी नदीवर पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील नागरिक, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे विसर्जनासाठी येत असतात, यावर्षी कोरोणाचे गांभीर्य लक्षात घेता कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या हद्दित गणेश विसर्जन करण्यासाठी येऊ नये यासाठी आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका महापौर, आयुक्त आणि पोलिस प्रशासन यांना निवेदन दिले यावेळी आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे, माजी नगरसेवक अशोक उमरगेकर, ज्ञानेश्वर रायकर, भैरवनाथ उत्सव मंडळाचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, जालिंदर महाराज भोसले उपस्थित होते. यावेळी आळंदी शहरात सुध्दा कोरोणा रुग्णांचे प्रमाण वाढत असून त्यामुळे या गोष्टीचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी एक गाव एक गणेशोत्सवची संकल्पना राबवली असुन तसेच शहरातील नागरिकांनी घरातील गणेश मूर्ती विसर्जन घरातच विसर्जन करण्यात यावे यासाठी नगरपरिषद मार्फत जनजागृती करण्यात येत आहे.