पिक विमा योजनेचा लाभ न देणाऱ्या कंपनीचे कार्यालय बंद करू-संभाजी दहातोंडे यांचा इशारा
नेवासा,दि 15 (प्रतिनिधी)ः
विमा योजनेचा लाभ न देणाऱ्या कंपनीचे कार्यालय बंद करू असा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेश अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिला.
नगर जिल्ह्यातील विमा कंपन्यांनी खरीप 2020 मधील विमा योजनेचा लाभ न देणार्या व विमा हप्ते भरून घेणाऱ्या भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कार्यालय बंद करण्याचे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी असा ईशारा दिला आहे.
नगर जिल्ह्यातील खरीप 2020 या हंगामात 4 लाख 66 हजार शेतकऱ्यांनी विविध पिकांचा 2 लाख 59 हजार 448 हेक्टरवर विमा उतरवला आहे. त्यापोटी शेतकऱ्यांकडून 148 कोटी रुपयांचा हप्ता भरलेला असून, तेवढीच रक्कम शासनाकडून ही विमा कंपनीला गेली आहे.745 कोटी रुपये यातून संरक्षित झाले आहे गेल्या वर्षी खरिपातील राज्यातील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिकविमा कंपन्यांनी गतवर्षीच्या खरिपातील विम्याचा लाभ दिला आहे.नगर जिल्ह्याचा मात्र याबाबत अजून निर्णय झालेला नाही.गेल्या वर्षी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.यावर्षीच्या खरीपाआधी पीकविम्याचा लाभ मिळणे गरजेचे असताना दुर्लक्ष केले जात आहे.शेतकऱ्याकडून पीकविमा हप्ता भरून घेऊन विम्याचा लाभ देण्यासाठी विलंब का लावला जात आहे.याची चौकशी करून संबंधित भारतीय एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड यांच्यावर कारवाई करण्याबाबत कार्यवाही करावी.अन्यथा एक्सा जनरल इन्शुरन्स कंपनी कार्यालयात आंदोलन करून कार्यकर्ते कार्यालय बंद पडतील असे संभाजी दहातोंडे यांनी निवेदनात म्हटले आहे.