पुणे ,मुंबईतील चाकरमान्यांना सोडताहेत मोकाट , ग्रामपंचायतची कोरोना समिती ठरतेय निष्फळ

0 108

देशासह जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सोलापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने स्थानिक नागरिक चिंतेत आहेत. ताळेबंदी शिथील केल्याने नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्या आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिल्याने जिल्ह्यातील काही भागात कोरोनाचा शिरकाव झालेला नाही.

 

दरम्यान गेल्या दोन महिन्यात पुणे,मुंबईसह परजिल्ह्यातुन सोलापूर शहर व ग्रामीण भागात येणाऱ्या लोकांची संख्या हजारोने वाढलीय. ग्रामपंचायत पातळीवर कोरोना समन्वय समिती कार्यरत आहे, यामध्ये सरपंच , ऊपसरपंच, तलाठी , ग्रामसेवक , कृषीसहाय्यक, पोलीस पाटील यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश आहे. या समितीच्या वतीने बाहेरून गावात आलेल्या लोकांची माहिती गोळा करणे , जंतुनाशक फवारणी करणे,सोशल डिस्टंन्सिंगच पालन करुन जनतेला मास्क वापरणं बंधनकारक करणं यासह वेळोवेळी प्रशासनाला सहकार्य करणं याची जबाबदारी आहे.
ताळेबंदी शिथील केल्यामुळे इतर जिल्ह्यातुन येणाऱ्या लोकांची संख्या वाढतेय. ग्रामीण भागात ही समिती कार्यरत असताना त्यांच्यावतीने आलेल्या नागरिकांची माहीती जाणुनबुजून दडवत असल्याची माहिती समोर आलीय. दोनच दिवसापुर्वी पंढरपूर तालुक्यातील ऊपरी गावात मुंबईहुन आलेला एकजण कोरोनासदृश्य निघाला, त्याच्या संपर्कात आलेल्या ४९ लोकांना क्वारंटटाईन केल्याची माहिती समोर आलीय. वेळीच याची खबरदारी घेतली असती तर पुढील अनर्थ घङला नसता असे नागरिकांचे म्हणणे आहे .

 

येत्या काही महिन्यात राज्यातील हजारो ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर बहुतांशी गावात परगावातून आलेल्या लोकांची माहिती असतानाही स्थानिक राजकारणी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे अप्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार चालुय. एकगठ्ठा मतदान , जवळचा-लांबचा , याची सांगड घालत दुजाभाव करुन दुर्लक्ष करण्याचे प्रकार ठिकठिकाणी चालु आहेत. त्यातुनच ऊपरी गावात घङलेला प्रकार आहे अशी चर्चा सोशलच्या माध्यमातून चालु झालीय. या प्रकाराला प्रशासनाने वेळीच आवर घालावी अन्यथा त्याचे भयंकर दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागतील अशी चर्चा नागरिकामधुन सुरु झालीय.
– सदाशिव पोरे

सिद्धी विनायक कामथ यांना “कोविड योद्धा सन्मान”

error: Content is protected !!