पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी
- विभागात कोरोना बाधित 14 हजार 650 रुग्ण -विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर
पुणे,प्रतिनिधी – पुणे विभागातील 9 हजार 105 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 हजार 650 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 04 हजार 887 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 658 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 271 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्हयातील 11 हजार 397 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 7 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 811 आहे. कोरोनाबाधित एकूण 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 263 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्हयामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.38 टक्के आहे.
कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 573 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 424, सातारा जिल्ह्यात 14, सोलापूर जिल्ह्यात 108, सांगली जिल्ह्यात 21 तर कोल्हापूर जिल्ह्यात 6 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्हयातील 718 कोरोना बाधीत रुग्ण असून 472 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 215 आहे. कोरोनाबाधित एकूण 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हयातील 1 हजार 612 कोरोना बाधीत रुग्ण असून 814 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 661 आहे. कोरोना बाधित एकूण 137 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हयातील 213 कोरोना बाधीत रुग्ण असून 106 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 101 आहे. कोरोना बाधित एकूण 06 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हयातील 710 कोरोना बाधीत रुग्ण असून 603 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 99 आहे. कोरोना बाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 लाख 14 हजार 118 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 01 लाख 10 हजार 148 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 980 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 95 हजार 241 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 14 हजार 650 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.
कोरोना चाचण्यांसाठी आता सर्वात कमी दर महाराष्ट्रात
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});