पुण्यनगरीत संतांच्या पालख्यांचे प्रतिकात्मक स्वागत सोहळा करुण परंपरा जपली

0 69

पुणे – आषाढी एकादशीच्या निमित्ताने पायी जाणारा पालखी सोहळा दरवर्षी जेष्ठ कृ.नवमी म्हणजे आजच्या तिथीला आळंदी वरुन माऊली आणि देहू वरुन तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यांचे पुण्यात आगमन होत असते. पुणे महानगरपालीका दरवर्षी नित्यनेमाने दोन्ही पालख्यांचे जंगी स्वागत करण्यात येते. परंतू या वर्षी पालखी सोहळे पुण्यात कोरोणा रोगाच्या पार्श्वभूमीवर येणे शक्य नाही तरीही गाथा आणि ज्ञानेश्वरीचे प्रतिकात्मक स्वागत आणि पुजन करून संतांचे स्वागत करण्याची आपली परंपरा पुणेकरांनी अबाधित ठेवली आहे. हा प्रतिकात्मक स्वागत सोहळा आज सकाळी पार पडला. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहळ, आयुक्त शेखर गायकवाड, सुनील महाजन, सचिन ईटकर, संत साहित्याचे गाढे अभ्यासक सदानंद मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.



error: Content is protected !!