पुरंदर तालुक्यात राष्ट्र सेवा दल व संविधान प्रचारक यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

0 106

पुरंदर,प्रतिनिधी : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या भीषण संकटात सामान्य नागरिकांचे खूप हाल होतांना दिसून येत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्र सेवा दलाचे राज्य कार्यकारिणी सदस्य आणि संविधान प्रचारक श्रीकांत लक्ष्मी शंकर यांच्या प्रयत्नातून तसेच कोरो संस्था, मुंबई आणि संविधान प्रचारक यांच्या आर्थिक सहकार्याने, राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून पुरंदर तालुक्यात 210 गरजू लोकांना अत्यावश्यक व जीवनावश्यक किराणाचे किट देण्यात आले.

ही मदत देताना विधवा-परित्यक्ता महिला, भूमीहीन, बिगारी, शेतमजूर, विविध छोटे छोटे व्यवसाय करणारे लोक, अश्या गरजू लोकांचा शोध घेऊन त्यांच्यापर्यंत हा तांदूळ, तेल, गहू, मीठ, मिरची, चहापावडर, साखर, इ. १६ वस्तू समाविष्ट असणारा प्रत्येकी एक हजार रुपयांचा शिधा पोहोचविण्यात आला.

पुरंदर तालुक्यातील वाल्हे, सुकलवाडी, सासवड, जेजुरी, पारगाव, माळशिरस, पोंढे, राजुरी, परिंचे इ. १५ गावांमधील एकूण २१० कुटुंबांना प्रत्येकी एक हजार रुपयांचा (एकूण दोन लाख दहा हजार रुपये) शिधा वाटप करण्यात आला.

याकामी कोरो संस्था व संविधान प्रचारकचे नागेश जाधव, संदीप आखाडे तसेच एड. कमलेश म्हेत्रे, सारिका भोसले, जयश्री नलगे, संतोष पवार, धनंजय पवार यांच्यासह राष्ट्र सेवा दल , मासूम संस्था, मँजिक बस आदींनी मोलाचे सहकार्य केले.

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी; त्यासाठी असणार आहेत या अटी

 

error: Content is protected !!