पुरंदर शिक्षण विभागाचा प्रेरणादायी उपक्रम

0 107

पुरंदर, निखिल जगताप – येथे पुरंदरच्या शिक्षण विभागाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या ८० गरजू लोकांना वैयक्तिक आरोग्यासाठी गरजेच्या वस्तू तसेच कपडे देऊन इतरांपेक्षा वेगळे व स्तुत्य सामाजिक कार्य केले.

जेजुरी येथे पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी तथा कोरोनाचे संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे सहाय्यक न्यूडल अधिकारी मोहन गायकवाड यांनी नुकतीच भेट दिली होती.तेव्हा या व्यक्तिंशी चर्चा केली तेव्हा,कपडे, अंतर्वस्त्र ,कपड्याचा साबण ,अंगाचा साबण, तेल,मास्कची इत्यादी आवश्यक बाबींची गरज पाहून या वस्तू येथील गरजूंना देण्यासंबंधी पुरंदरच्या शिक्षकांना मदतीविषयी आवाहन केले.त्यास तालुक्यातील बहुसंख्य शिक्षकांनी स्वयंप्रेरणेने व सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आर्थिक व वस्तूरुपाने उस्फुर्त प्रतिसाद दिला.
या सर्व साहित्यांचे वाटप पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
“या मिळालेल्या साहित्याचा योग्य विनियोग करुन लॉक डाऊनच्या काळात स्वच्छतेच्या सवयी बानवाव्यात व सातत्य राखावे. परिसराची योग्य काळजी घ्यावी. सर्वांनी सहकार्याने राहावे.लॉकडाऊनबाबत शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत सर्वांनी येथेच राहावे लागेल अशा प्रकारे सर्वांचे समुपदेशन मोहन गायकवाड यांनी काढले.
पुरंदर तालुक्यातील शिक्षकांनी आपत्कालीन परिस्थितीत दिलेल्या योगदानाबद्दल गौरवोद्गार गायकवाड यांनी काढले व सर्वांना धन्यवाद दिले.
यावेळी लोकमतचे तालुका प्रतिनिधी बी.एम.काळे,जेजुरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.प्रबंध भिसे, वैद्यकिय अधिकारी तथा गटप्रमुख कोवीड १९ डॉ.महेश मेश्राम,जेजुरी नगरपालिका अधिकारी बाळासो बगाडे, केंद्रप्रमुख सुरेश लांघी,सतिश कुदळे,सुनिल लोणकर,तानाजी झगडे,संदीप कदम,नंदकुमार चव्हाण,महादेव माळवदकर,अनिल चाचर,शरद पवार,सतिश कुंजीर,सुनिल कांबळे,सोपान जगदाळे,सचिन सातभाई,प्रितम बारभाई,मधुबाला कोल्हे,रुपाली कुंजीर,निर्मला घाटे,शारदा सोनवणे,बाळासाहेब दोडके आदि मान्यवर व उपस्थित सर्वच शिक्षक बंधू-भगिनींच्या हस्ते करण्यात आले.

error: Content is protected !!