पुरात वाहून गेलेल्या शिवडी ते गुरुकुल खेडे आश्रम पुलाचे काम त्वरित सुरू करा-खा.डाॅ भारती पवार यांना निवेदन

शिवडी शिष्टमंडळाने दिले खा.डाॅ भारती पवार यांना निवेदन

2 247

निफाड,दि 01 (प्रतिनिधी)ः-
शिवडी गाव ते श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल खेडे आश्रम व विद्युत वितरण कंपनी उपकेंद्र खेडे यांना जोडणाऱ्या शिवडी ते गुरुकुल खेडे आश्रमाकडे जाणारा विनता नदीवरील पूल पूर पाण्याने वाहून गेला असून या पुलाचे काम त्वरित करण्यात यावे अशी मागणी शिवडी शिष्टमंडळाने दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ.भारती पवार यांना निवेदन देऊन केली आहे.
या निवेदनात असे म्हटले आहे की शिवडी गाव ते गुरुकुल खेडे आश्रमाला जोडणारा हा अतिशय जवळचा रस्ता असून विंता नदीवर याअगोदर कच्चा पूल बांधण्यात आला होता परंतु सातत्याने पुराचे भाऊ पाणी वाहत असल्याने हा पूल वाहून गेला असून सद्यस्थितीत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागत आहे. परंतु पर्यायी मार्गाचा अवलंब करताना दुचाकी अथवा चारचाकी चच उपयोग केल्याशिवाय संपर्क होऊ शकत नाही तसेच खेडे येथे असलेले उपकेंद्र यांनाही जोडणारा हा नजीकचा रस्ता असल्याने विद्युत वितरण कंपनीचे कर्मचाऱ्यांनाही शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे तसेच शिवडी गावातील वयस्कर पुरुष व महिला भाविकांना श्री संत जनार्दन स्वामी गुरुकुल खेडे आश्रमात दर्शनाला जाताना
शिवडी उगाव खेडे व गुरुकुल आश्रम असा पायी प्रवास साधारणत पाच किलो मीटर करावा लागत असल्याने विनता नदीवरील हा पूल होणे अत्यंत गरजेचे आहे. वरील सर्व बाबींचा विचार करून खासदार भारती पवार यांनी लक्ष घालून संबंधित विभागाची चर्चा करून लवकरात लवकर पूल सुरू करावा असे या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देण्याप्रसंगी माजी सरपंच भगीरथ शिंदे ,भाजपा नेते संजू दादा शिंदे, सोसायटी माजी चेअरमन पी डी खापरे, ग्रामपंचायत सदस्य मोहन खापरे, नवनाथ शिंदे, विलास मंडलिक ,नंदू कातकाडे , सामाजिक कार्यकर्ते विलास शिरसागर, उपसरपंच संजय घाडगे, जय बाबाजी भक्त परिवाराचे राजाभाऊ पानगव्हाणे आदी उपस्थित होते.

विनता नदीवर नव्यानेच पूल बांधण्यात आला होता परंतु सातत्याने पाण्याचा फुगवटा व विनता नदीला येणाऱ्या पुरामुळे हा पूल खचून पूर्णता वाहून गेला असून संपर्क तुटल्याने उगाव, खेडे व शिवडी या गावातील नागरिकांना शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. चांगल्या पद्धतीचे काम केले तर निश्चितच तीनही गावातील नागरिकांना फायदा होईल.
संजुदादा शिंदे, भाजपा नेते.

error: Content is protected !!