पोलिस उपाधीक्षक करत आहेत जादुच्या प्रयोगाच्या कलेतून कोरोना जनजागृतीचे कार्य
नाशिक , प्रतिनिधी – नंदुरबार येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत असलेले शिरीष जाधव हे त्यांच्याकडे असलेल्या जादुच्या प्रयोगाच्या कलेतून कोरोना जनजागृतीचे कार्य करत आहेत. सामाजिक काम म्हणून जादू प्रयोगातून अंधश्रद्धा निर्मूलन हा कार्यक्रम त्यांनी महाराष्ट्रातील कित्येक ठिकाणी सादर करून समाज जागृती केली होती व सध्या पण करीत आहेत.
सध्या सर्वत्र कोरोणा संकट असताना नोकरी सांभाळून सुद्धा त्यांच्यातील कलाकार जागरूक राहिल्याचे दिसत आहेत कोरोना बाबतचे विविध संदेश ते आपल्या प्रयोगातून दाखवताहेत कोरोनाव्हायरस असे टाईप केलेले काही कागदाचे चौकोनी तुकडे एका भांड्यात टाकून ते त्याच भांड्यात कागदावरच्या संदेशात सुरक्षित अंतर राखा ,साबणाने हात स्वच्छ धुवा ,घरी थांबा, पोलिसांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना सहकार्य करा अशा स्वरूपाचे वेगवेगळे संदेश टाईप केलेले कागद त्यातून ते काढत आहेत असे हे व्हिडीओ चित्रीकरण फेसबुक व्हाट्सअप द्वारे विविध ग्रुपमध्ये व्हायरल होत असलेले या अधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे फेसबुक भागातून त्यांच्या सामाजिक कामांबाबत अभिनंदन केले जात आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे योग्य मार्गदर्शनाने मी सातत्याने सामाजिक काम करीत आलो आहे व पुढेही हे काम चालू ठेवीन.
शिरीष जाधव, उप अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नंदुरबार