पोलीस नाईक स्वाती वाघमारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा..

0 96

वडवणी, प्रतिनिधी:- वडवणी पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या स्वाती वाघमारे (सोनवणे) यांचा वाढदिवस वडवणी पोलीस स्टेशनच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने वडवणी पोलिस स्टेशनचे पी.एस.आय परदेशी साहेब पी.एस.आय गव्हाणे साहेब पोलीस नाईक संजय राठोड,माळी, उबाळे , गीते. गरजे.नागरगोजे,गगावणे.

बारगजे,राख,निगुळे.मुंडे. आघाव,गायकवाड, वडमारे, शिदे मामा सह महिला पोलीस कर्मचारी माने मॅडम,साळवे मॅडम, काटकर मॅडम,यादव मॅडम,तसेच इतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान पोलीस नाईक स्वाती सोनवणे यांचे मिस्टर पत्रकार सतीश सोनवणे यांना पण या वाढदिवसा दरम्यान बोलवण्यात आले होते.

सध्या कोरोणाच्या संकटामध्ये वडवणी पोलिस स्टेशनचे सर्व कर्मचारी सतर्कतेने आपले कर्तव्य बजावत वडवणी शहरातील नागरिकांची काळजी घेत सर्वांना शासनाच्या नियमाचे पालन करण्याचे आव्हान शहरातील नागरिकांना करण्यात येत आहे.

आपले कर्तव्य बजावत असताना पोलिस कर्मचाऱ्यांचा वाढदिवस असल्या नंतर पोलिस स्टेशनच्या वतीने कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या जातात या कार्यक्रमा मुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह, आनंद, निर्माण होऊन एक मेकां विषयी आपुलकी,प्रेम, वाढून काम करण्यास उत्साह येतो.आशी प्रतिक्रिया यावेळी पोलीस नाईक स्वाती वाघमारे यांनी व्यक्त केली.

तसेच सामाजिक बांधिलकी जोपासत पोलीस नाईक स्वाती वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त शेतात वृक्षारोपण करण्यात आले, यावेळी त्यांच्यासोबत सासरे अभिमान सोनवणे व सासू सरूबाई सोनवणे दिसत आहेत.. वृक्षारोपण करत वाढदिवस साजरा केल्याने त्यांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

टाकरवण येथे अंगणवाड्यांची दैनिय अवस्था

 

error: Content is protected !!