प्रत्येक गावातील सरपंचांनी आपले गाव कोरोना मुक्त होण्यासाठी पुढाकार घ्यावा– बाळासाहेब क्षीरसागर

नाशिक जिल्ह्याची कोरोना मुक्त गाव अभियानाकडे वाटचाल

0 187
निफाड, रामभाऊ आवारे – आज सोमवार दिनांक 26 एप्रिल 2021 पंचायत समिती निफाड सभागृहात कोविड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  प्रतिबंधात्मक उपाय योजने साठी आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.बैठकीस मा नामदार बाळासाहेब क्षिरसागर,अध्यक्ष जिल्हा परिषद नाशिक,आ. दिलीप बनकर निफाड विधानसभा मतदार संघ,मा श्रीमती लीना बनसोड मुख्य जिल्हा परिषद नाशिक,मा सचिन पाटील पोलीस अधिक्षक नाशिक ग्रामीण, श्रीमती सुवर्णा जगताप सभापती कृ उ बा समिती लासलगाव,श्रीमती सुलभा पवार सभापती निफाड पंचायत समिती, पंढरीनाथ थोरे , अर्जुन भोसले पोलीस उप अधिक्षक नाशिक ग्रामीण,  सोमनाथ तांबे पोलीस उपअधीक्षक निफाड, शरद घोरपडे तहसीलदार निफाड, संदीप कराड गटविकास अधिकारी निफाड,श्रीमती श्रीया देवचक्के मुख्याधिकारी नगर पंचायत निफाड,रंगराव सानप पोलीस निरीक्षक निफाड, अशोक रहाटे पोलीस निरीक्षक ओझर,पटारे पोलीस निरीक्षक पिंपळगाव ब, अडसुळे सहा पोलीस निरीक्षक, राहुल वाघ सहा पोलीस निरीक्षक, डॉ रोहन मोरे वैद्यकीय अधिक्षक ग्रामीण रुग्णालय निफाड,डॉ चेतन काळे नोडल अधिकारी निफाड उपस्थित होते.
 
   जि.प.अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षिरसागर यांनी निफाड तालुक्यात आज रोजी 3157 ऍक्टिव्ह रुग्ण असून दररोज 300 ते 400 रुग्णाची रोज नव्याने भर पडत आहे। त्याला जर आळा बसवायचा असेल तर माझे कुटुंब माझी जबाबदारी अंतर्गत सर्वेक्षण कटेकोर पणे करावे लागेलं तसेच ज्या गावांत कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहे त्या गावातील सरपंच,ग्रामसेवक,सदस्य,पोलीस पाटील यांनी जबाबदारी घेऊन गाव कोरोना मुक्त करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे,गावात लसीकरणाच्या बाबतीत जनजागृती करून लसीकरण वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न व्हावेत तसेच प्रतिनबंधात्मक उपाय योजनांचे काटेकोर पालन करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
आमदार दिलीप बनकर यांनी औषध व ऑक्सिजन तुटवड्या बाबत चर्चा केली.पिंपळगाव बसवंत येथील भीमाशंकर इंग्लिश स्कुल मध्ये 65 बेडचे सर्व सोयी सुविधा युक्त कोविड सेंटर ची सुरुवात करण्यात आले आहे तसेच नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट ची सुरुवात करण्यात येत असल्याचे सांगितले. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी conatainment zone मधील नियमांचे अतिशय कडक पालन करण्याबाबत तसेच निफाड गटातील पॉसिटीव्हीटी रेट 40 पेक्षा अधिक असून सदर रेट 10 पेक्षा कमी येण्याकरिता जास्तीत जास्त टेस्ट चे नियोजन करून कार्यवाही करण्याबाबत प्रशासनाला सूचित केले। Hot spot असलेल्या गावामध्ये लसीकरणाचे नियोजन करून जास्तीत जास्त लसीकरण करण्याबाबत सांगितले।ज्या रुग्णांना सौम्य लक्षणे आढळून येतात त्यांना गृह विलगिकण करण्यात यावे परंतु ज्या रुग्णांना घरी पुरेशी व्यवस्था नाही त्यांना गावातील संस्थात्मक विलगिकरण केंद्रात व्यवस्था करण्यात यावी .सचिन पाटील पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांनी ग्रामस्तरीय समिती मध्ये पोलीस प्रशासनाच्या एका व्यक्तीच्या समावेश करण्यात यावा जेणेकरून गावात नियम पालनासाठी मदत होईल तसेच लसीकरणा च्या कॅम्प चे वेळापत्रक दिल्यास तिथेही पोलीस मनुष्यबळ गरजेनुसार पुरवण्यात येईल त्यामुळे गर्दीवर नियंत्रण करता येईल.
error: Content is protected !!