प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा – प्रविण साले

0 122

शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी भाजपा पदाधिकारी सज्ज

नांदेड – अतिवृष्टी अथवा इतर नैसर्गिक आपत्तीमधून सावरण्यासाठी शेतकऱ्यांजवळ आपल्या शेतातील पिकांचा पिकविमा संरक्षण असणे अत्यंत आवश्यक असून यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा,तसेच शेतकरी सन्मान योजनेसाठी बँकेच्या अधिकारी यांच्याशी समन्वय साधून मदत करू,असे आवाहन भाजपा महानगराध्यक्ष प्रविण साले यांनी केले.

भारत सरकार मार्फत प्रधानमंत्री पिक विमा योजना लागू केली व महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकरी सन्मान योजना लागू केली असून याअंतर्गत पिक विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे,या विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग घेऊन पिक विमा हप्ता भरण्यासाठी शेवटच्या आठवड्याची वाट न बघता लवकरात लवकर पिक विमा भरून घ्यावा,शेतकऱ्यांनी विमा भरण्यासाठी सी.एस.सी. सेंटरवर किंवा बँकेत सोशल गर्दी न करता डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करावे…

यावेळी चालू खरीप हंगाम सन २०२०-२१ मध्ये प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यात राबविण्यासाठी “इफको टोकियो जनरल इंशुरन्स कंपनी लि.” या कंपनीची तीन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे,या योजनेत शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) सहभागी होण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२० आहे,ही योजना कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे,पण सर्वच शेतकऱ्यांनी पीक विमा भरावा आपले शेताचे संरक्षण करावे,या साठी आपल्या मदत लागत असल्यास नांदेड दक्षिण मधील बालाजी पाटील पुयड,सुनील मोरे व नांदेड उत्तर प्रताप पावडे,बंडू पावडे,संतोष क्षीरसागर भाजपा ज्येष्ठ पदाधिकारी यांच्याशी सम्पर्क साधावा,आपल्याला सर्वतोपरी मदत केली जाईल.

विवाह सोहळ्यासाठी आता फक्त दहा लोकांची परवानगी; त्यासाठी असणार आहेत या अटी
५० टक्के कापूस तर ४० टक्के क्षेत्रावर सोयाबीन, माजलगांव तालुक्यात ७० टक्के पेरण्या पूर्ण

error: Content is protected !!