प्रमोद लोणे परिवाराच्या वतीने २०० कुटुंबियांना आयुक्त डाॅ.सुनिल लहाने यांच्या हस्ते जीवनोपयोगी साहित्य वाटप
नांदेड, प्रतिनिधी – कोरोना जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य प्रर्दुषन नियंत्रण महामंडळाचे मुंबई क्षेत्र अधिकारी प्रमोद लोणे, लहानकर परिवाराच्या वतीने ओंकारेश्वर नगर, प्रेमनगर, जैनमंदीर परिसरातील २०० गोरगरिब कुटुंबियांना नांदेड वाघाळा शहर महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते आज जीवनाश्यक वस्तू व सर्व धान्य किटसचे वाटप करण्यात आले.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक कामगारांचे रोजगार गेल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे. सर्वसामान्य लोकांचे जीवन सुसह्य व्हावे यासाठी प्रमोद लोणे, लहानकर परिवाराच्यावतीने ओंकारेश्वरनगर, प्रेमनगर व जैन मंदीर परिसरातील २०० कुटुंबियांना एक महिना पुरेल इतके जीवनाश्यक वस्तू व तांदूळ, साखर, दाळ आदी धान्य मालाचे किट नांदेड वाघाळा महानगर पालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. याप्रसंगी नांदेड जिल्हा पत्रकार संघाचे सरचिटणीस तथा दैनिक दलितवाणीचे जिल्हा प्रतिनिधी सुभाष लोणे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिगंबर ढोले, माजी सरपंच बालाजी कुऱ्हाडे, शिक्षक व कर्मचारी संघटनेचे केंद्रीय नांदेड जिल्हाध्यक्ष तथा डॉ.बाबासाहेब आंबेडक अर्बन को.ऑप.बँक लि. जिल्हा नांदेडच्या सल्लागार समितीचे अध्यक्ष बालासाहेब लोणे, ज्येष्ठ संगितकार तथा पत्रकार सदाशिव गच्चे, मा.सौ.प्रणिता प्रमोद लोणे,लहानकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमोद लोणे, सुभाष लोणे, बालासाहेब लोणे, सुनील लोणे, मधुकराव गच्चे पाटील, भगवान कदम, राजेंद्र वाहेवळ,प्रतिक लोणे, हर्षवर्धन लोणे, उमेश शिंदे, सुभाष वानखेडे, संभाजी नागरगोजे, दशरथ राठोड, व्यंकटराव नरवाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
दानशूर व्यक्तिनी गोरगरीबांना मदत करण्यासाठी पुढे यावे-नांदेड मनपा आयुक्त डॉ.सुनील लहाने
कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच संकटात आहे. हे सकंटही एक दिवस जाणारच आहे. यासाठी शासन, प्रशासन आपापापल्या परीने आटोकाट प्रयत्न करतच आहे. परंतू संकटाची व्याप्तीच मोठी आहे. अनेक लोक बेरोजगार झाल्यामुळे सामान्य लोकांचे जगणे कठीण झाले आहे.प्रशासन सर्व प्रयत्न करत आहेच. पण कोरोना पासुन संरक्षण करताना एकही भूकबळी जावू नये, यासाठी समाजातील प्रत्येक दानशूर व्यक्तीनी स्वयंस्फूर्तीने पुढे यावे असे आवाहन नांदेड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.सुनील लहाने यांनी केले ते बोलताना पुढे म्हणाले की, नांदेड शहरातील नागरिकांनी कोरोनाला घाबरून न जाता, शारिरीक आंतर ठेवा, सॅनिटॅझर वापरा, मॉस्कचा नियमित वापर करा परंतू सामाजिक दुरावा निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. गोरगरिब असहाय्य लोकांना प्रत्येक सक्षम व दानशूर व्यक्तिनी मदतीसाठी पुढे यायला हवे असे सांगून लोणे परिवाराचे विशेष कौतुक लहाने यानी केले.
विद्यापीठांच्या परीक्षांबाबतची अनिश्चितता संपणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
लाॅकडाऊन ५.० संदर्भात केंद्र सरकारची मोठी घोषणा