प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर, अमळनेर कोविड सेन्टर मधील गायब रुग्णांचे अपघाती निधन
अमळनेर, भुषण जाधव – अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयाच्या कोविड सेन्टर मधून बापू निंबा वाणी हा रुग्ण स्वब घेण्यापूर्वीच 3 दिवसापासून बेपत्ता होता. त्याच्या विषयी माजी आमदार स्मिता वाघ यांनी प्रशासनाची चूक लक्षात आणून जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या कडे लेखी तक्रार देऊन जाब विचारला मात्र राऊत यांच्या कडे त्याचे उत्तर नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली असून बापू वाणीचा शोधा शोध सुरु झाला. तरी पण त्यांना बापू वाणीचा शोध लागला नाही. शेवटी बापू निंबा वाणी यांचे आज दिनांक 13 जुलै 2020 रोजी सकाळी विचखेडा तालुका पारोळा येथे अपघाती निधन झाले.अशा प्रकारे जळगाव जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणेचा दिवसेंदिवस अनागोंधी कारभार वाढत आहे. तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जळगाव जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
या प्रकरणाची जबाबदारी जिल्हाधिकारी अभिजित राऊत , पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले व उपविभागीय अधिकारी सीमा अहिरे तसेच संबंधित कर्मचाऱ्यांवर होती. मात्र आज त्यांनी त्यांची चोख कर्तव्य पार पडली असती तर आज बापू निंबा वाणी अपघाती मरण पावला नसता. या सर्वस्वी प्रकाराला जबाबदार धरून त्याच्यावर कडक कारवाही करावी अशी अमळनेर जनतेची व माजी आमदार स्मिता वाघ यांची मागणी आहे.