प्रसिद्ध ज्येष्ठ पत्रकार, शिक्षक सुगंध गुट्टे यांचे निधन
परळी ,प्रतिनिधी- परळी येथील ज्येष्ठ पत्रकार व शिक्षक सुगंध अण्णासाहेब गुट्टे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. मागील दहा ते बारा दिवसापासून पुणे येथील रुबी रुग्णालयांमध्ये ते उपचार घेत होते उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
संत तुकाराम विद्यालय नागापूर कॅम्प येथे ते शिक्षक म्हणून कार्यरत होते. तसेच पत्रकार पत्रकारिता क्षेत्रातील एक नावाजलेले व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या जाण्याने शिक्षण व पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात वडील पत्नी मुलगी दोन भाऊ दोन बहिणी असा भरगच्च परिवार आहे. त्यांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली आहे. त्यांच्या दुःखात दै शब्दराज परिवार सहभागी आहे.
लॉकडाऊनचे कारण दाखवून बिस्किटांची टंचाई, दुकानांमध्ये छापील किमतीपेक्षा जादा दराने विक्री
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});