प्रा.शिवाजी सूर्यवंशी यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर
पूर्णा, सुशीलकुमार दळवी – जामगव्हाण येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील कनिष्ठ महाविद्यालयीत उच्च माध्यमिक शिक्षक या पदावर कार्यरत असलेले प्रा.शिवाजी सूर्यवंशी यांना शैक्षणिक वर्ष २०२०-२१ चा उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.ते गेली १९ वर्षे शासकीय आदिवासी विकास विभागात उच्च माध्यमिक शिक्षक म्हणून सेवेत आहेत.आतापर्यंत त्यांनी पांढरकवडा,किनवट प्रकल्पात सेवा केली असून ते आता कळमनुरी प्रकल्पात जामगव्हाण येथील शासकीय आश्रमशाळेत कार्यरत आहेत.आपले अध्यापनाचे कर्तव्य बजावत असतांना त्यांनी अनेक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या व समाजाच्या हितासाठी शैक्षणिक व सामाजिक कार्यात आपला सक्रिय सहभाग नोंदवला आहे.
गेल्या वर्षी “कोरोना कोव्हीड-19 ” च्या जागतिक महामारीच्या भयंकर परिस्थितीत स्वतःच्या जीवाचा कुंटूंबियांचा विचार न करता लॉकडाऊन मध्ये अनलॉक लर्निंग शिक्षण विद्यार्थ्यांच्या दारी हा उपक्रम हाती घेतला. एकच ध्यास घेऊन गावोगावी जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे,नोट्स देणे, समजत नसलेल्या घटकावर पुन्हा पुन्हा शिकविणे व नंतर झालेल्या घटकावर परीक्षा घेणे आदी उपक्रम त्यांनी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविले. कोरोनाची साथ पसरू नये म्हणून कोरोना काळात काळजी कशी घ्यावी यावर मार्गदर्शन, कोरोना महामारीत खावटी योजनेचे फार्म भरुन निवडलेल्या लाभार्थींना अन्न धान्य किटचे वाटप करणे, घरकुल योजनेचा सर्वे, अशा अनेक उपक्रमांतर्गत आदिवासी गरीब व गरजवंताला लाभ होईल असे सामाजिक कार्य त्यांनी सातत्याने केले आहे.
कोरोना कोव्हीड -19 च्या महामारीत लाॅकडाऊन मध्ये गरीब मजुर लोकांच्या हाताला काम नव्हते. अशा भयानक परिस्थितीमध्ये त्यांनी लसाकम या कर्मचारी युनियनच्या माध्यमातून 50 क्विंटल अन्न धान्य वाटप केले. तसेच गरजवंताला रक्ताची गरज पडल्यास ते लवकर मिळावे म्हणून लसाकम आणि शासकीय रक्तपेढीच्या संयुक्त विद्यमाने रक्त दान शिबिराचेही आयोजन केले होते.अशा विविध शैक्षणिक व सामाजिक कार्याची पावती म्हणून प्रा.शिवाजी सूर्यवंशी यांना एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कळमनुरी जि. हिंगोलीच्या वतीने उत्कृष्ट पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री. एन.जी.गायकवाड, शाळेतील शिक्षक, कर्मचारी व मित्र परिवाराकडून अभिनंदन केले आहे.