फुले चौक भागात घाणीचे साम्राज्य, नगरपालिका व लोकप्रतिनिधिंनी जनतेच्या आरोग्याशी खेळु नये अन्यथा तिव्र आंदोलन : नरहरी सुरवसे
परळी, प्रतिनिधी – येथील प्रभाग क्रमांक 4 मधील फुले चौक, देशमुख गल्ली आदी भागामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले असुन जागोजागी कचऱ्याचे ढीग व नालीतील सांडपाणी रस्त्यावर साचत आहे.
यामुळे येथिल नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून नगरपालिका प्रशासन व लोकप्रतिनिधिनी नागरिकांच्या आरोग्याशी निगडित प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन येथील जनतेच्या आरोग्याची होणारी हेळसांड थांबवावी अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा फुले चौक भागातील युवकनेते नरहरी सुरवसे, पांडुरंग जाधव, तुकाराम वाकडे, पवन सुरवसे यांनी दिला आहे.
सध्याच्या घडीला संबंध जग कोरोनाच्या सावटाखाली असुन आपला देशदेखील कोरोनामुळे त्रस्त आहे.महाराष्ट्रात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत जात असुन सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. सरकार तथा प्रशासकीय यंत्रणा सार्वजनिक स्वच्छतेवर भर देण्याचे आवाहन करत आहे.
याच पर्शवभूमीवरती परळी वैजनाथ येथील प्रभाग क्र 4 मधील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असुन येथील नगरपालिका प्रशासनास व जनतेचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या पुढाऱ्यांना याचे काहीच सोयर सुतक असल्याचे जाणवत नाही. या भागामध्ये जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले असून नाल्या देखील तुंबलेल्या आहेत यामुळे नालीतील घाण सांडपाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून आता पावसाळ्यास सुरुवात झाल्यामुळे हा प्रश्न अधिक जटिल होऊ पाहत आहे.
यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असुन रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. तरी येथील नगरपालिका प्रशासनाने व लोकप्रतिनिधी म्हणून मिरवणाऱ्या नगरसेवकांनी जनतेच्या आरोग्याशी खेळु नये व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी अन्यथा येथील जनतेस सोबत घेऊन तिव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या भागातील युवक नेते नरहरी सुरवसे, पांडुरंग जाधव, तुकाराम वाकडे, हनुमान नाईकवाडे, पवन सुरवसे आदींनी दिला आहे.
दुरावलेली नाती लॉकडाऊनमध्ये जुळली
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});