बीडच्या बालेपीरचा काही भाग कंटेन्मेंट झोन घोषित

0 93

बीड, प्रतिनिधी – शहरात राहणारा एक व्यक्ती कोरोनाग्रस्त आढळून आल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या बालेपीर भागातील व्यक्तिंमुळे येथील काही भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी घोषित केला आहे .

त्यानुसार बालेपिर भागातील संभाजीनगरचा शेख खालील्लोद्दीन शेख हाफीजोद्दीन यांच्या घरापासून ते विजयकुमार किसनराव वीर यांच्या घरापर्यंतचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात येत आहे . पुढील अनिश्चित काळासाठी हा परिसर पूर्णवेळ बंद ठेवण्यात येत आहे , असे जिल्हाधिकारी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे .

error: Content is protected !!