बीडमध्ये आणखी दोन पॉझिटीव्ह; आकडा ४१
बीड, प्रतिनिधी – बीडच्या काल प्रलंबित असलेल्या सात अहवालांचा निष्कर्ष आला असून यातील दोन अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत . तर ५ निगेटीव्ह आले आहेत . यामुळे बीड जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या कोरोना रूग्णांची संख्या आता ४१ झाली आहे . रविवारी बीड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात स्वॅब पाठविण्यात आले होते . त्यातील पन्नास निगेटीव्ह आल्याने काहीसा दिलासा मिळाला होता . मात्र उरलेल्या सातपैकी दोनजण पॉझिटीव्ह आले असून ते बीड शहरातील आहेत .