बीड जिल्हा आणखी तीन पॉझिटीव्ह ; तिघे कोरोनाग्रस्त बीड, कुंडी , वडवणीतील
बीड, प्रतिनिधी – बीड जिल्ह्यात शनिवारचा दिवसही धक्का देणारा ठरला . कुंडी , वडवणी व बीड येथील प्रत्येकी एक जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे , अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली . आज दिवसभरात ४३ स्वब नमुने पाठविण्यात आलेले होते . पैकी तीन पॉझिटिव्ह असून ३९ निगेटिव्ह आले आहेत तर १व्यक्तीच्या स्वबबाबत कुठलाच निष्कर्ष ( इनकन्क्लीजिव ) निघालेला नाही . यापुर्वी ६ स्वबबाबतही कुठलाच निष्कर्ष निघालेला नव्हता . आता हे सहा स्वँब आज रात्रीतून घेतले जाऊन उद्या सकाळी पाठविले जाणार आहेत . आज पॉझिटीव्ह आलेले ३आणि यापुर्वीचे अॅक्टीव्ह ३० असे मिळून ३३ रुग्ण सध्या बीड जिल्ह्यात उपचार घेत आहेत . तर रुग्ण पुण्यात हलविले असून एक मयत झालेला आहे . तर अन्य एक रुग्ण बरा झालेला आहे . त्यामुळे जिल्ह्याच्या नावावर आता ४१ जणांची नोंद झाली आहे .
बीड शहरात आढळलेला रुग्ण हा पालवण चौकातील आहे . तो मुंबईहून येतानाच त्याला लक्षणे आढळून आल्याने तो घरी न जाता थेट जिल्हा रुग्णालयात गेलेला आहे . तर वडवणीत आढळलेला रुग्ण हा पुर्वीच्या एका रुग्णाच्या संपर्कातील आहे . कुंडी येथील रुग्णही पुर्वीच्याच रुग्णाच्या संपर्कातील आहे , अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे .