बीड जिल्हा : आणखी सहा पॉझिटीव्ह
बीड, प्रतिनिधी – आज जिल्ह्यातून पाठविलेल्या ४० स्वबपैकी ६ जण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. यात पाटोदा, वडवणी व साखरे बोरगाव येथील रुग्णांचा समावेश आहे. आजच्या अहवालाकडे जिल्हा पोलीस, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांचे विशेष लक्ष होते. कारण काही पोलीसांचेही स्वँब घेण्यात आले होते.
काल बीड शहरात पॉझिटीव्ह आढळून आलेल्या एकास राजुरी चेक पोस्टवर पोलीसांनी अडवलेले होते. पण या पोलीसांचे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आढळून आले आहेत. पोलीसांच्या सतत संपर्कात असलेले पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्त्यांनाही यामुळे दिलासा मिळाला आहे.
…हे राज्यातील जनतेसाठीचे पॅकेज-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
धक्कादायक ! परभणी जिल्ह्यात आढळले नवे 14 कोरोनाबाधित रुग्ण; एकुण रुग्णसंख्या 36
खळबळजनक… बीडमध्ये तिहेरी हत्याकांड; महिलेसह दोन मुलांची हत्या