बीड जिल्ह्यातील 7 तालुक्यात कोरोनाचा शिरकाव

0 244

बीड, प्रतिनिधी – पहिल्या लॉकडाऊनपासून कडेकोट नियम पाळताना जिल्ह्याच्या नाकात दम आलेला होता. चौथा लॉकडाऊन तोंडावर असताना त्यातून जिल्ह्याला थोडी मोकळीक मिळेल अशी आशा सर्व जिल्हावासियांना होती. परंतु अचानक मुंबई – पुणे ठाण्यावरून परतणारे नागरिक बीड जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्ह आढळून येऊ लागले. आणि अवघ्या पाच दिवसात कोरोनबाधीत रुग्णांची जिल्ह्यात असलेली अॅक्टीव्ह संख्या १६ वर जाऊन पोहोचली. आतापर्यंत कोरोनाने ७ तालुक्यांना बाधा पोहोचवली असून ३तालुके अद्याप सेफ आहेत.

सर्वप्रथम गेवराई तालुक्यातील इटकूर आणि माजलगांव तालुक्यातील हिवरा येथे शनिवारी रुग्ण सापडले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी रविवारी आष्टी तालुक्यातील पाटण सांगवीत तब्बल ७ कोरोनाबाधीत सापडले. त्यातील एका वृध्द महिलेचा मृत्यू देखील झाला. पण ते आता जिल्ह्यात नाहीत. तिसऱ्या दिवशी सोमवारी पुन्हा माजलगाव तालुक्यातील कवडगाव थडी येथे दोन कोरोनाबाधीत आढळून आले. मंगळवारी येणारे रिपोर्ट बुधवारी पहाटे आले त्यात बीड शहरातील ५, केज तालुक्यातील चंदन सावरगाव येथे १, केळगाव येथे १, गेवराई तालुक्यातील इटकूर येथे पुन्हा १ रुग्ण आढळून आला. त्यानंतर लागलीच आज गुरुवारी पहाटे ४जण कोरोनाबाधीत असल्याचे आढळून आले . त्यात पहिल्यांदाच पाटोदा शहरात १ आणि तालुक्यातील वाहली येथे १ आणि वडवणी शहरात १ कोरोनाबाधीत आढळून आले आहेत.

जिल्ह्यातून २० मेपर्यंत अंदाजित ७५६ स्वब आतापर्यंत पाठविण्यात आले होते. त्यातील २१ स्वब पॉझिटीव्ह आढळले आहेत. शनिवार (दि. १६मे) पासून ते बुधवार (दि .२०मे) पर्यंत पाच दिवसात २९४ स्वब पाठविण्यात आले होते. पैकी २३ स्वब (पाटणसांगवीसह) पॉझिटीव्ह आढळून आले. म्हणजेच पाच दिवसात १०० स्वबमागे सरासरी १२ते १३ रुग्ण आढळून आले आहेत. शिवाय अद्याप १३व्यक्तींचे अहवाल अद्याप प्रलंबीत असून ६ जणांचा अद्याप निष्कर्ष काढता आलेला नाही. रुग्णवाढीचा हा दर निश्चित चिंताजनक आहे.

जिल्ह्याल समाधानाची बाब एवढीच की शिरूर, धारूर, परळी आणि अंबाजोगाई हे तालुके अजुनही सेफ आहेत. परंतु याही तालुक्यात बाहेरगावहून मोठ्या प्रमाणावर नागरिक आलेले आहेत. त्यामुळे आता हे समाधानही किती काळ टिकून राहते हे पहावे लागेल.

कंटेनमेंट व बफर झोनमध्ये असणाऱ्या गावांमध्ये सातत्याने वाढ
एखाद्या परिसरात रुग्ण आढळून आला तर शासनाने ठरवून दिलेल्या गाईडलाईननुसार रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासूनचा तीन कि.मी. परिसर कंटेनमेंट झोन तर कंटेनमेंट झोनच्या पुढील सात कि.मी.परिसर बफर झोनमध्ये सामाविष्ट होतो. पहिल्यांदाच अख्खे पाटोदा शहर कंटेनमेंट झोन जाहीर झाले आहे. तर जिल्ह्यातील ९२गावे कंटेनमेंट तर ५१ गावे बफर झोनमध्ये आहेत. त्यात वाडी, वस्ती, तांडा यांचाही समावेश आहे.

२१ मे पर्यंतची आकडेवारी (सकाळी ११:३० पर्यंत)

• आष्टी तालुका
शहर – ००
पिंपळा -०१

•गेवराई तालुका
शहर -०० इटकूर ०२

•माजलगांव तालुका
शहर – ००
हिवरा – ०१
कवडगाव थडी – ०२

•बीड तालुका
•शहर – ०५

•केज तालुका
शहर – ००
चंदन सावरगाव- ०१
केळगाव – ०१

•वडवणी तालुका
शहर – ०१

•पाटोदा तालुका
शहर -०१
वाहली -०२

एकूण – १७
अॅक्टीव्ह रुग्ण – १६
बरे झालेले रुग्ण – ०१ ( पिंपळा ता.आष्टी )

• पाटण सांगवीत आढळलेल्या ०७ रुग्णांची नोंद बीड जिल्ह्यातून काढून टाकण्यात आली आहे.

घराच्या अंगणाला ‘रणांगण’ बनवणं याला शहाणपण म्हणत नाहीत;महाराष्ट्र कमकुवत करण्याचा प्रयत्न जनताच हाणून पाडेल- अजित पवार



error: Content is protected !!