बीड जिल्ह्यातून ११० स्वॅब तपासणीसाठी रवाना
बीड, प्रतिनिधी – बीडमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतच असून आज बीड जिल्हा रुग्णालयामधून ३७ तर जिल्हाभरातून एकूण ११० स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
बीडमध्ये गेवराई आणि माजलगावमध्ये दोन रुग्ण सापडल्यानंतर दुसर्या दिवशी आष्टीत सात रुग्ण सापडले. त्यापाठोपाठ पुन्हा काल ८ रुग्णांची भर पडली. त्यामुळे आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून ज्यांना कोरोनाचे प्राथमिक लक्षणे आहेत अशांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत . आज बीड जिल्हा रुग्णालयामधून ३७ स्वॅब तर जिल्हाभरातून एकूण ११० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हारुग्णालय ३७, अंबाजोगाई ०३, परळी ०४, आष्टी १६, गेवराई ०५, माजलगाव ४३, केज ०२ असे एकूण ११० स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.