बुलढाण्यात ‘शोले स्टाइल’ थरार; तीनशे फूट उंच टॉवरवर चढलेल्या इसमाला तीन तासानंतर खाली उतरवण्यात यश

0 98

बुलढाणा, प्रविण बुधवत – सासरा व पत्नीने मारहाण केली म्हणून तालुक्यातील सव येथील गजानन रोकडे या युवकाने येथील बीएसएनएलच्या तीनशे फूट उंच टॉवरवर चडून सबंध प्रशासनाला वेठीस धरल्याची घटना आज दुपारी 3 वाजता समोर आली. तब्बल 3 तास प्रशासनाने त्याची समजूत काढल्यानंतर अखेर सदर व्यक्तीला खाली उतरवण्यात यश आले असून प्रशासनाने सुटकेचा निश्वास सोडला आहे.

आज दुपारी तीन वाजता सव येथील गजानन रोकडे नामक व्यक्ती अचानक बीएसएनएलच्या तीनशे फूट उंच टॉवरवर चढला. माहिती मिळताच
नगर, पोलीस, महसूल प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.. रोकडे यांना खाली बोलवण्यासाठी त्यांची हरतऱ्हेने समजूत घालण्यात आली. गजानन रोकडे यांची आई, दोन लहान मुलं यांनीही त्याची विनवणी केली. तीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अखेर गजानन रोकडे यास टॉवरवरून खाली उतरवण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे.

पत्नी भांडण करते व माहेरी निघून गेली. आणायला गेलो तर सासरा व पत्नीने मारहाण केली.. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी सदर व्यक्ती 300 फूट उंच टॉवरवर चढला असल्याची माहिती मिळते आहे. सद्यस्थितीत पोलिसांनी गजानन रोकडे यास ताब्यात घेतले असून त्याची विचारपूस केल्या जात आहे. दुपारी तीन वाजेपासून ते सहा वाजेपर्यंत बीएसएनएल टॉवर परिसरात सुरु होता.

आ. प्रकाश सोळंकेंनी कोरोना काळात घेतला मेळावा
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पुण्यात पुन्हा लॉकडाऊन?



error: Content is protected !!