बोंदरवाडी ग्रामस्थ विद्युत मंडळाच्या गलथान व आळशी कारभारामूळे त्रस्त

0 190

मानवत , प्रतिनिधी – मानवत तालुक्यातील बोंदरवाडी या गावाला गेल्या एक महिन्यां पासुन थ्री फेज लाईन नसुन या बाबत विज मंडळाला माहिती असुन ही मंडळा च्या जाणून बूजून दूर्लक्ष व गलथान कारभारा मुळे ग्रामस्थ त्रासुन गेले असुन या बाबत ग्रामस्थांच्या वतीने मानवत येथील विज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता यांना या संबंधीचे निवेदन देण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की , मानवत तालुक्यातील बोंदरवाडी या गावाला पाळोदी येथील ३३ के.व्ही.या उपकेंद्रा मधुन व सावरगांव फिडर द्वारे विज पुरवठा करण्यात येतो. परंतू मागील एक महिन्यां पासुन या गावाला थ्रीफेज विजेचा पुरवठा होत नाही , त्यामुळे गावातील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी , पिठाची गिरणी , पाणीपुरवठा करणाऱ्या मोटारी बंद असुन गावात पिण्याचे पाणी मुबलक आहे पण मोटारसाठी लागणारी थ्री फेज लाईन नसल्याने गावकऱ्यांना अनेक अंधारात राहण्याची व अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे.

तसेच सध्या शेतात फवारणी व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळणे अवघड होऊन बसले आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असुन रात्री गावा मध्ये अंधाराचे साम्राज्य होत असल्याने साप विंचु निघण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. विद्युत मंडळाने गावाला थ्री फेज विजेचा पुरवठा त्वरीत उपलब्ध करून द्यावा अशी मागणी बोंदरवाडी च्या ग्रामस्थांनी मानवतच्या विज वितरण कंपनीचे कनिष्ट अभियंता यांच्याकडे एका निवेदना द्वारे मागणी केली आहे.

परळी एसबीआयच्या संपर्कातील त्या 1418 लोकांची होणार कोरोना टेस्ट

 

error: Content is protected !!