ब्रेकिंग न्यूज – बीड जिल्ह्यात कोरोनाचे २ रुग्ण पाॅझिटिव्ह; जिल्हा ग्रीन झोनमधून आँरेंज झोनमध्ये

0 198

बीड – महाराष्ट्रातील अनेक जिल्हे ग्रीन झोनमध्ये असताना पुण्यामुंबईवरुन अनधिकृत येणाऱ्या लोंढ्यांमुळे त्यांना आँरेंज झोनमध्ये जावे लागत आहे. काल परभणी जिल्हा ग्रीन झोनमधून आँरेंज झोनमध्ये गेला. लागलीच आज बीड जिल्ह्यात अनधिकृत आलेल्या 2 जणांचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने बीड जिल्हा हादरला आहे. हे दोन रुग्ण प्रत्येकी गेवराई आणि माजलगाव मधील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

लॉकडाऊन- 4.0 ची घोषणा : 18 मे ते 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन कायम

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

इतके दिवस कोरोना विरोधात लढविलेली खिंड अखेर निष्फळ ठरली. यामुळे आता बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दोन वर गेली आहे. या दोन रुग्णांचे कोरोना नमुने पॉझिटिव्ह आल्याची पुष्टी बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी केली आहे. आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.

लाॅकडाऊन 4.0 : महाराष्ट्रात काय राहणार सुरु आणि काय बंद जाणून घ्या !

लेटेस्ट अपडेट साठी like आणि follow करा शब्दराज फेसबुक पेजला…

error: Content is protected !!