भयमुक्त समाजासाठी ग्रामिन भागात किर्तनाची परवानगी द्या

0 99

वारकरी साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गुलाबराव महाराज यांची मागणी

यवतमाळ : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने नागरीकांमध्ये प्रचंड भिती निर्माण झाली आहे. त्याअनुषंगाने नागरीकांचे आत्मबल वाढविण्यासाठी तसेच किर्तनाच्या माध्यमातून नागरीकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ग्रामीन भागात किर्तनाची परवानगी देण्याची मागणी वारकरी साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गुलाबराव महाराज राऊत यांनी राज्य सरकारकडे केली आहे. सध्या कोरोना महामारीने सर्वत्र अशांती तसेच समाजात भयग्रस्त वातावरण निर्माण झाले आहे. प्रयत्न करुनही कोरोनाचा संसर्ग थांबलेला नाही. आतातर शहराच्या पाठोपाठ ग्रामीन भागात सुध्दा मोठया प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. या आजारावर कुठलाच उपाय नसल्यामुळे नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक गावात तर बाहेरच्या व्यक्तीस गावात प्रवेश देण्यास बंदी घालण्यात आली आहे. मनुष्याचे आत्मबल कमजोर असल्यास त्याचा प्रतिकार शक्तीवर सुध्दा विपरीत परीणाम पडत असतो. या आजारामध्ये प्रामुख्याने प्रतिकार शक्ती तसेच आत्मबल चांगले असल्यास रोगाचा प्रतिरोध केल्या जाऊ शकतो. भजन, किर्तनामुळे नागरीकांचे मन शुध्द राहते तसेच आत्मबल बलवान होते. अशा पध्दतीने पॉझीटीव्ह एनर्जीचा मनुष्याच्या मनावर चांगला परीणाम पडत असल्याचे शास्त्रीय दृष्या सुध्दा सिध्द झाले आहे. त्यामुळे भजन किर्तनाचा नागरीकांच्या मनातील भिती दुर करण्यासाठी चांगला उपयोग केल्या जाऊ शकतो. या अनुषंगाने सोशल मिडीयावर सुध्दा ग्रामीन भागात भजन, किर्तनास नियमांच्या अधीन राहून परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान वारकरी साहित्य परीषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. गुलाबराव महाराज राऊत यांनी ग्रामीन भागात भजन किर्तन सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

सरकारने भावना समजून घ्यावी

ग्रामीन भागात कोरोनामुळे भय निर्माण झाले आहे. हे भय दुर करणे गरजेचे आहे. भजन किर्तनाच्या माध्यमातून तसेच प्रबोधनाच्या माध्यमातून नागरीकांच्या मनातील भय दुर केल्या जाऊ शकते. ग्रामीन भागात 50 भाविकांसह भजन किर्तन करण्यास परवानगी देण्याची मागणी केली जात आहे. या मागणीला आता समाजातून सुध्दा चांगला पाठींबा मिळत आहे. त्यामुळे सरकारने वारकरी समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहीजे.
– सिकंदर शाह महामंत्री, वारकरी साहित्य परीषद.

READ THIS – प्रवासासाठी ई-पास कसा मिळवायचा?
READ MORE – सावधान… मोफत वेबसाईटवर चित्रपट, वेब सिरीज पाहणे टाळा, नागरिकांसाठी सरकारचे अलर्ट



error: Content is protected !!