भाजपच्या वतीने वडवणी तालुक्यात गोरगरीब जनतेला किराणा साहित्य, सँनिटायझर, मास्कचे वाटप
वडवणी, प्रतिनिधी – भाजपच्या नेत्या ,माजी पालकमंत्री पंकजाताई मुंडे, खा.डॉ. प्रितमताई मुंडे, माजलगांव मतदारसंघाचे नेते रमेशराव आडसकर यांच्या आदेशाने भाजपा वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वडवणी तालुक्यातील प्रत्येक गावागावात कोरोना विषाणूच्या या संकटाच्या काळात सामाजिक जाणीव म्हणून नुकतेच कारखान्या वरून परत आलेल्या उसतोड मजूर, गोरगरीब, निराधार यांना किराणा साहित्य,सँनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले आहेत.
सध्या कोरोना विषाणू रोखण्यासाठी देशात व राज्यात योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असून त्याचाच भाग म्हणून सध्या लाँकडाऊन सुरू असुन सर्व उद्योग, व्यवहार हे बंद आहेत तसेच बाहेर राज्यात, परराज्यात कारखान्याला उसतोडणीसाठी गेलेले उसतोड मजूर हे आपल्या गावात परत आलेले आहेत तरी त्यामुळे गोरगरीब ,उसतोड मजूर यांच्या वर उपासमारीची वेळ आलेली आहे या संकटाच्या काळात आधार देण्यासाठी भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे, खा.प्रितमताई मुंडे, भाजपा नेते रमेशराव आडसकर यांच्या आदेशाने तालुक्यातील या गोरगरीब, उसतोड मजूर, निराधार यांना भाजपा वडवणी तालुका अध्यक्ष पोपटराव शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील प्रत्येक गावातील सरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी किराणा साहित्य, सँनिटायझर, व मास्कचे वाटप जनतेला केले आहे. तरी वडवणी तालुका भाजपच्या या सामाजिक उपक्रमांचे सर्व स्तरातुन अभिनंदन होत आहे. तसेच हे सामाजिक उपक्रम राबवून जनते विषयी असणारे दायित्व व सामाजिक भावना दाखवून दिली आहे.