भाजपा नाशिक महानगराच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती उत्साहात साजरी…
नाशिक,प्रतिनिधी – भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्यावतीने महाराणा प्रतापसिंह यांची जयंती सोशल डिस्टंनसिंग व इतर सर्व नियमांचे पालन करून साजरी करण्यात आली. प्रारंभी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, बबलुसिंह परदेशी यांनी महाराणा प्रतापसिंह यांची जीवनाविषयी माहिती उपस्थितांना दिली.
याप्रसंगी कल्याणसिंह परदेशी, सजनसिंह पवार, भावेश राजपूत, नितून परदेशी, सुरेद्रसिंह मुटे, प्रभू महाराज, अमोल परदेशी, घनश्यामसिंह परदेशी, मनोज ठाकूर, मिलिंद पदरेशी, देवेंद्र चुंभळे, समाधान सोनवणे, विजय कुलकर्णी, दिपक सोनवणे आदी उपस्थित होते.
आळंदी शहरात दोन मंगल कार्यालय मालकावर गुन्हा दाखल